घरताज्या घडामोडीIndian Ayurvedic Treatment: जगभरात भारताच्या आयुर्वेदिक उपचारांचा डंका; WHO गुजरातमध्ये ग्लोबल सेंटर...

Indian Ayurvedic Treatment: जगभरात भारताच्या आयुर्वेदिक उपचारांचा डंका; WHO गुजरातमध्ये ग्लोबल सेंटर उभारणार

Subscribe

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक पारंपारिक औषध केंद्राची (India Traditional Medicine) स्थापना करण्यासाठी भारत सरकारसोबत करार केला आहे. गुजरातच्या जामनगरमध्ये या केंद्राची स्थापना करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करून याबाबत सांगितले आहे. मोदी म्हणाले की, ‘भारतातील पारंपारिक औषध आणि चांगल्या आरोग्य पद्धती जगभरात खूप लोकप्रिय होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे सेंटर आपल्या समाजातील आरोग्य सुधारण्याच्या वाढीसाठी खूप मदत करेल.’

ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसिनची स्थापनेच्या करारावर स्वित्झर्लंडच्या जिनेव्हामध्ये भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेमधील करारावर स्वाक्षरी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालकांनी पाचव्या आयुर्वेद दिवसानिमित्ताने १३ नोव्हेंबर २०२० रोजी घोषणा केली होती. केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतामध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपारिक औषधी केंद्राची स्थापना करण्याची ९ मार्चला मंजूरी दिली होती.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, पारंपारिक औषधांच्या जागतिक ज्ञानाच्या या केंद्रासाठी भारत सरकारने २५० मिलियन डॉलरची मदत केली आहे. याचा उद्देश लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आधुनिक विज्ञान आणि प्रौद्योगिकी माध्यमातून जगभरात पारंपारिक औषधांच्या संभाव्यतेचा उपयोग करणे आहे. सध्याच्या घडीला १९४ जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य देशांपैकी १७०ने पारंपारिक औषधाच्या वापराची सूचना दिली आहे. या देशांच्या सरकारने पारंपारिक औषध पद्धतीने आणि उत्पादनावर विश्वसनीय साक्ष्य आणि डेटाचे एक बॉडी बनवण्याच्या दिशेने जागतिक आरोग्य संघटनेचा पाठिंबा मागितला आहे.

- Advertisement -

सध्या भारताच्या पारंपारिक औषध उपाचारपद्धतीचा चांगलाच बोलबोला आहे. दरम्यान आफ्रिकी देश केन्याचे माजी पंतप्रधानची मुलगी डोळ्यांनी पाहू शकत नव्हती. केरळमधील आयुर्वेदिक उपचारांनी त्यांच्या मुलीवर उपचार केला गेला आणि चमत्कारच झाला. माजी पंतप्रधान रॅला ओडिंगा यांच्या मुलीला दृष्टी मिळाली, तिला डोळ्यांची दिसायला लागले. यानिमित्ताने ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले आणि भारताच्या या पारंपारिक पद्धतीचे कौतुक केले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -