घरताज्या घडामोडीModi Birthday: मोदींच्या ७१व्या वाढदिवसानिमित्ताने गंगेला वाहिली ७१ मीटरची चुनरी अन् लावले...

Modi Birthday: मोदींच्या ७१व्या वाढदिवसानिमित्ताने गंगेला वाहिली ७१ मीटरची चुनरी अन् लावले जाणार ७१ हजार दिवे

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाच्या ७१व्या वर्षात पर्दापण केलं आहे. सध्या त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या आधीच्या रात्री त्यांच्या संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या जवाहर नगरस्थित कार्यालयात उत्सवाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने दिवे लावले. संपूर्ण ऑफिस फुग्यांनी सजवले होते. गंगा सेवा निधीने दशश्वमेध घाटावर होणाऱ्या आरतीमध्ये विशेष पूजा केली गेली. शिवाय त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच ७०१ दिवे लावून ७१वा वाढदिवस लिहून गंगेत दिवस सोडले.

आज पंतप्रधानांचा वाढदिवस असल्यामुळे देशभरात मोदीमय वातावरण झालं आहे. आज सकाळी गंगेला ७१ मीटर चुनरी वाहली. याशिवाय आसा महाविद्यालय बाबतपुरमध्ये श्रम सन्मान सोहळा होईल. दरम्यान वाराणसीतील भारत माता मंदिरमध्ये संध्याकाळी सहा वाजता ७१ हजार दिव्यांनी भव्य दीपोत्सव साजरा केला जाईल. या कार्यक्रमात ललित कला अकादमीचे विद्यार्थी मोदींची रांगोळी काढून दिवे लावतील. तसेच जिल्हा आणि महानगरातील मंदिरांमध्ये आरती केली जाईल. घरा-घरात दिवे लावले जातील आणि ८ विधानसभा मतदारसंघात ७१-७१ किलो लाडू वाटले जातील.

- Advertisement -

काशी संकल्पच्या नेतृत्वाखील आयोजित पुस्तकाचे प्रकाशन आणि परिसंवादाच्या उद्घाटनंतर मोदींचा वाढदिवस साजरा करताना ७१ किलो लाडूचा केक कापला गेला. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेची घोषणा केली आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आज बनारसमध्ये येणार असून आज न्यायालयातील आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी स्वच्छता मोहिम होणार आहे.


हेही वाचा – E-Auction: मोदींच्या भेटवस्तूंचा आज ई लिलाव; ऑलिम्पिक खेळाडूंच्या जॅव्हेलिन, बॅडमिंटन, हॉकी स्टिकचा समावेश

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -