माँ काली देशाच्या भक्तीचे केंद्र

वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

72 percent people in india beleive that infaltion has increased during narendra modi regime

माँ कालीच्या पोस्टरवरून वाद सुरू असतानाच माँ काली हे संपूर्ण देशाच्या भक्तीचे केंद्र आहे. त्यांचे आशीर्वाद देशावर राहोत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. स्वामी आत्मस्थानंद यांच्या जयंती कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करीत होते.

दिग्दर्शक लीना मणिमेकलाई यांनी काही दिवसांपूर्वी काली या माहितीपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या पोस्टरमध्ये काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. हे पोस्टर समोर येताच वादाला सुरुवात झाली होती. भाजप पदाधिकार्‍यांकडून मणिमेकलाई यांच्यावर अनेक राज्यांत गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर मणिमेकलाई यांनी आणखी एक पोस्टर शेअर केले होते, ज्यामध्ये शिव आणि पार्वतीदेखील सिगारेट ओढताना दाखवले होते.

या वादात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी उडी घेत सर्वांसाठी धर्मस्वातंत्र्य असायला हवे. तारापीठात माँ कालीला मद्य अर्पण केले जाते. माझ्यासाठी काली मांसाहार करणारी, वाईन स्वीकारणारी देवी आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. महुआ यांच्या या वक्तव्यावरूनही गदारोळ झाला होता.