घरताज्या घडामोडी...म्हणून भारत एक विश्वासार्ह भागीदार, FIPICच्या संमेलनात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

…म्हणून भारत एक विश्वासार्ह भागीदार, FIPICच्या संमेलनात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य

Subscribe

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहेत. यावेळी ते FIPIC च्या शिखर संमेलनात सहभागी झाले. दरम्यान, विकासाच्या बाबतीत आणि मदतीसाठी भारत एक विश्वासार्ह भागीदार असल्याचं मोठं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदी समकक्ष जेम्स मारापे यांच्यासह फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक बेटे कोऑपरेशन (FIPIC) च्या तिसऱ्या शिखर परिषदेला उपस्थित होते. या परिषदेत त्यांनी अडचणीच्या काळात भारत आपल्या मैत्रीपूर्ण पॅसिफिक बेट देशांच्या पाठीशी उभा राहिला याचा मला आनंद आहे. भारत सर्व भागीदार देशांना आपल्या क्षमतेनुसार मदत करत आहे. ‘अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड’, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

कोविड महामारीचा सर्वाधिक परिणाम ग्लोबल साउथच्या देशांवर झाला. हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती, उपासमारी, गरिबी आणि आरोग्याशी संबंधित आव्हानं आधीच होती. आता इंधन, खत आणि फार्मा यांसारख्या नवीन समस्या निर्माण होत आहेत. अडचणीच्या काळात भारत आपल्या मैत्रीपूर्ण पॅसिफिक बेट देशांच्या पाठीशी उभा राहिला याचा मला आनंद आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

- Advertisement -

‘वसुधैव कुटुंबकम’ ही आमची मूळ प्रेरणा

भारतीय विचारधारेत संपूर्ण जग एक कुटुंब प्रमूख म्हणून पाहिले जाते. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही आमची मूळ प्रेरणा आहे. G20 अध्यक्षपदासाठी आमची थीम, ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ देखील याच भावनेवर आधारित आहे.
G7 शिखर परिषदेतही गेल्या दोन दिवसांत माझा हाच प्रयत्न होता. भारताने हवामान बदलाच्या मुद्द्यावर महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहेत. आम्ही या वेगाने काम करत आहोत याचा मला आनंद आहे, असं मोदी म्हणाले.

मोदींनी जपानमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान किशिदा, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांची भेट घेतली. २४ मे रोजी मोदी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. ते ऑस्ट्रेलियन कंपन्यांच्या सीईओ आणि व्यावसायिक नेत्यांशी सिडनी येथे एका सामुदायिक कार्यक्रमात संवाद साधतील आणि सर्वांना संबोधित करणार आहेत.


हेही वाचा : Karnataka election : काँग्रेसला मिळालेल्या विजयामागे आमचा ‘हात’, आपचा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -