घरCORONA UPDATEउद्या लॉकडाऊनचा २१ वा दिवस; मोदी सकाळी काय बोलणार?

उद्या लॉकडाऊनचा २१ वा दिवस; मोदी सकाळी काय बोलणार?

Subscribe

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांची लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी यावर पंतप्रधान कोणता निर्णय घेणार हे उद्या कळणार आहे. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचा लक्ष लागून आहे.

देशातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक राज्यांनी लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी केली होती. दरम्यान, उद्या लॉकडाऊनचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला मंगळवारी सकाळी १० वाजता संबोधित करणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अनेक राज्यांची लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी यावर पंतप्रधान कोणता निर्णय घेणार हे उद्या कळणार आहे. देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचा लक्ष लागून आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी ११ एप्रिल रोजी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊचा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात येणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदीही देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यासंदर्भात काही घोषणा करतात का याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, महाराष्ट्रसह तेलंगणा, ओदिशा, पश्चिम बंगालनेही ३० एप्रिलपर्यंत तर पंजाबने १ मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा आकडा २ हजारांच्या वर; सरकारने मागवले सर्व जिल्ह्यांचे अहवाल


लॉकडाऊनच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवसापासून देशभरात स्थलांतरित झालेल्या मजुरांनी गावाकडची वाट धरल्याने लॉकडाऊनचे तीनतेरा वाजले. गेल्या २१ दिवसांच्या काळात मोदींनी दोन वेळा देशाला संबोधित केलं आहे. पहिल्यांदा त्यांनी कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी थाळी वाजवण्याचे आवाहन केलं होतं. मात्र, यावेळी लोकांनी कायद्याचं उल्लंघन करत रस्त्यावर आले होते. त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा घरातील लाईट बंद करून दिवा लावण्यास सांगितला होता.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -