घरदेश-विदेशइंदिरा गांधींना त्यांची हत्या होऊ शकते हे माहीत होतं - प्रियंका गांधी

इंदिरा गांधींना त्यांची हत्या होऊ शकते हे माहीत होतं – प्रियंका गांधी

Subscribe

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आज(रविवार) उत्तर प्रदेशमधील गोरखपुर येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. त्याचबरोबर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी याच्याबाबत बोलताना भावूक झाल्या. तसंच, इंदिरा गांधी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि मला मृत्यू पूर्वी आम्हाला माझी हत्या होऊ शकते, असे संकेत दिले होते, असं देखील त्यांनी सांगितलं.

इंदिरा गांधींच्या आठवणीत प्रियंका भावूक झाल्या. त्या म्हणाल्या की “इंदिरा गांधींना माहिती होते की त्यांची हत्या होऊ शकते, त्यांनी मला आणि राहुल गांधी यांना सांगितलं की मला काही झालं तर रडू नका. तिला माहित होतं की तिचा खून होऊ शकतो पण ती कधीही झुकली नाही कारण तिच्यासाठी निष्ठेपेक्षा काहीही महत्त्वाचं नव्हतं. त्यांच्या शिकवणीमुळेच मी तुमच्यासमोर उभी आहे आणि तुमचा विश्वास कधीही तोडणार नाही,” असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

- Advertisement -

अमित शहांच्या दुर्बिणच्या वक्तव्यावर पलटवार

प्रियंका गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाली की, मी अमित शहा यांचे वक्तव्य ऐकलं आहे. आज उत्तर प्रदेशात गुन्हेगार शोधायचे असतील तर दुर्बिणीची गरज आहे, असे ते सांगत होते. विशेष म्हणजे अजय मिश्रा त्यांच्या बाजूला उभे होते. ज्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. मला त्यांना दुर्बीण सोडून चष्मा घालायला सांगायचं आहे. प्रियांका गांधी म्हणाल्या, महिला बुद्धिमान असतात. महिलांमध्ये लढण्याची क्षमता असते. महिलांवर अत्याचार झाले आहेत, पण जेव्हा जास्त महिला राजकारणात येतील तेव्हा त्यांना तोंड देऊ, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -