घरदेश-विदेशNupur Sharma Controversy : कुवेत सरकराचा मोठा निर्णय, आंदोलक परदेशी नागरिकांना करणार...

Nupur Sharma Controversy : कुवेत सरकराचा मोठा निर्णय, आंदोलक परदेशी नागरिकांना करणार हद्दपार

Subscribe

प्रेषित पैगंबर मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भारतासह जगभरातून संतापाची लाट उसळली आहे. अनेक मुस्लिम बहुल देशांनी त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. नुपूर शर्मा (Nupur Sharma Controversy) यांना अटक करत कडक कारवाईची मागणी आता जगभरातील आंदोलकांकडून करण्यात येत आहे. पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कुवेतमध्येही निदर्शने करण्यात आली. या आंदोलकांविरोधात आता कुवेत सरकारने कडक भूमिका घेतली आहे. कुवेतच्या फहेल भागात काही परदेशी आंदोलकांनी नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात घोषणाबाजी केली, त्यानंतर कुवेत सरकारने आंदोलकांना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Kuwait against protest)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विरोध करणाऱ्या आंदोलकांना अटक करत त्यांना कुवेतमधून हद्दपार केले जाणार आहे. यासोबतच त्यांनी कुवेतमध्ये पुन्हा प्रेवश करण्यावरही कायमची बंदी घालण्यात येणार आहे. कुवेतच्या कायद्यानुसार, देशातील स्थलांतरित किंवा परदेशातून आलेल्या नागरिकांना कुवेतमध्ये आंदोलन करणे किंवा निदर्शनात सहभागी होणे गुन्हा आहे. तसेच आंदोलनाचे आयोजित करणेही बेकायदेशीर मानले जाते. त्यामुळे नुपूर शर्माविरोधातील आंदोलनही देशाच्या नियमांचे उल्लंघन आहे. (kuwait government)

- Advertisement -

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कुवेतचे सरकारी अधिकारी परदेशी नागरिकांना अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहेत. तसेच कतारचे निर्वासन केंद्र सर्व आंदोकल परदेशी नागरिकांना निर्वासित करण्याच्या दिशेने काम करत आहे. कुवेतमध्ये आता या सर्व आंदोकल परदेशींना पुन्हा प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.

सरकारचे म्हणणे आहे की, कुवेतमधील सर्व परदेशी नागरिकांनी कुवेतच्या कायद्यांचा आदर केला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांमध्ये भाग घेऊ नये. कुवेतमध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांमध्ये भारतीय, पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुस्लिमांचा समावेश होता. दरम्यान पोलीस या आंदोलकांना अटक करून त्यांना निर्वासित केंद्रात पाठवणार आहेत. तेथून त्यांना त्यांच्या देशात पाठवले जाईल. तसेच त्यांचा व्हिसाही रद्द केला जाईल.

- Advertisement -

पैगंबर मोहम्मद वादावर कुवेत सरकार काय म्हणाले?

भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. त्यानंतर सर्व मुस्लिम देशांतून नुपूर शर्माविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. कुवेतच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय राजदूत सिबी जॉर्ज यांना बोलावून अधिकृत निषेध पत्र सादर केले. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित केले. त्याचे कुवेत सरकारनेही स्वागत केले.

नेमका वाद काय?

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही चर्चेदरम्यान प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. भारताशिवाय अनेक मुस्लिम देशांनीही याला विरोध केला. यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांना 6 वर्षांसाठी पदावरून निलंबित केले. त्यांच्या वक्तव्याविरोधात भारतातील अनेक राज्यांमध्ये सातत्याने निदर्शने होत आहेत.


राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -