घरदेश-विदेशदिल्लीकरांचे द्वेषाच्या राजकारणाला नव्हे, तर विकासाला मतदान : भगवंत मान

दिल्लीकरांचे द्वेषाच्या राजकारणाला नव्हे, तर विकासाला मतदान : भगवंत मान

Subscribe

दिल्ली महापालिकेसाठी ४ डिसेंबरला मतदान झाले. त्याची मतमोजणी बुधवारी झाली. त्यात आपला स्पष्ट बहुमत मिळाले. ही मतमोजणी सुरु असताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपच्या विजयाचे भाकीत केले. ते म्हणाले, दिल्लीत काँग्रेसने १५ वर्षे सत्ता केली. काँग्रेसला दिल्लीतून हलवणे अशक्य होते. असे असतानाही अरविंद केजरीवाल हे दिल्लीकरांचे मन वळवण्यात यशस्वी ठरले.

नवी दिल्ली: दिल्लीतील जनता शाळा, रुग्णालये, वीज, स्वच्छता, पायाभूत सुविधांना प्राधान्य देते. त्याआधारावरच दिल्लीकर मतदान करतात. त्यामुळेच आम आदमी पार्टीने (आप) गेली १५ वर्षे दिल्ली महापालिकेत एक हाती सत्ता असलेल्या भाजपला धक्का दिला आहे, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केला आहे.

दिल्ली महापालिकेसाठी ४ डिसेंबरला मतदान झाले. त्याची मतमोजणी बुधवारी झाली. त्यात आपला स्पष्ट बहुमत मिळाले. ही मतमोजणी सुरु असताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपच्या विजयाचे भाकीत केले होते. ते म्हणाले, दिल्लीत काँग्रेसने १५ वर्षे सत्ता केली. काँग्रेसला दिल्लीतून हलवणे अशक्य होते. असे असतानाही अरविंद केजरीवाल हे दिल्लीकरांचे मन वळवण्यात यशस्वी ठरले.

- Advertisement -

तसेच दिल्लीकरांना द्वेषाचे राजकारण आवडत नाही. येथील जनता शाळा, रुग्णालये, वीज, स्वच्छता, पायाभूत सुविधांना प्राधान्य देते. त्याआधारावरच दिल्लीकर मतदान करतात. त्यामुळेच आपने गेली १५ वर्षे दिल्ली महापालिकेत एक हाती सत्ता असलेल्या भाजपला धक्का दिला आहे

गुजरात, हिमाचल राज्य निवडणुकीसोबत दिल्ली महापालिकेची निवडणूक पार पडली. या तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे. या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी आम आदमी पार्टी (आप) मैदानात उतरली. एक्झिट पोलने गुजरात भाजपच्याच पदरात पाडले. हिमाचलचा अस्थीर निकालाचा अंदाज वर्तवला गेला. दिल्ली महापालिकेत मात्र आपचा बोलबाला राहिल, असे संकेत एक्झिट पोलने दिले.

- Advertisement -

बुधवारी सकाळी दिल्ली महापालिकेची मतमोजणी सुरु झाली. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरवत मतदारांनी आपला कौल दिला. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आपची विजयाकडे घोडदौड सुरु झाली. अंतिम निकालात आपने बाजी मारली. या निवडणुकीसाठी २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यात आपला २५० पैकी १३४ जागांवर यश मिळाले. तर भाजप १०४ जागांवर विजयी झाली आहे. काँग्रेसला केवळ ७ जागांवर विजय मिळवता आला आहे. तर ३ जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. या निकालामुळे भाजप विरोधी बाकावर बसणार आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -