घरताज्या घडामोडीशिवभोजन मोफत थाळी अन् पार्सलही होणार बंद, १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार १०...

शिवभोजन मोफत थाळी अन् पार्सलही होणार बंद, १ ऑक्टोबरपासून मोजावे लागणार १० रुपये

Subscribe

कोरोना महामारीच्या कठीण काळात राज्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्यात येत होती. मात्र आता शिवभोजन मोफत थाळी बंद होणार आहे. तसेच शिवभोजन केंद्रातून थाळी पार्सलही होणार नाही आहे. ३० सप्टेंबरपर्यंत शिवभोजन मोफत थाळी मिळणार असून १ ऑक्टोबरपासून थाळीसाठी १० रुपये मोजावे लागणार आहे.

राज्यातील ब्रेक द चेन अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध समाजघटकांसाठी मदतीचे जे पॅकेज घोषित केले होते, त्यामध्ये राज्यातील गरीब आणि गरजू लोकांसाठी मोफत शिवभोजन थाळीची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. मर्यादित कालावधीपर्यंत शिवभोजन थाळी मोफत देण्याचे ठरवण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील अनेक लोकांपर्यंत मोफत शिवभोजन थाळी पोहोचली आहे. पण आता ऑक्टोबरपासून ज्यापद्धतीने राज्यात अनलॉक केले जात आहे, त्यानुसार शिवभोजन थाळी मोफत सुविधा देखील बंद केली जाणार आहे. १ ऑक्टोबरपासून शिवभोजन थाळीसाठी १० रुपये मोजावे लागणार आहे. तसेच पार्सल देखील ऑक्टोबर महिन्यापासून बंद केले जाणार आहे.

- Advertisement -

राज्यात गेल्या २४ तासांत २ हजार ४३२ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार ८९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील आता कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४१ हजार ७६२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३८ हजार ९०२ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६३ लाख ६२ हजार २४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


हेही वाचा – WEATHER INFO : मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या ३ ते ४ तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -