घरदेश-विदेशRaghuram Rajan : तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी; रघुराम राजन असं का म्हणाले?

Raghuram Rajan : तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी; रघुराम राजन असं का म्हणाले?

Subscribe

भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी दावा केला की, मोठ्या संख्येने भारतीय तरुण आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी परदेशात जात आहेत, कारण ते भारतात आनंदी नाहीत. खरं तर भारतीय तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी आहे.

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी बुधवारी दावा केला की, मोठ्या संख्येने भारतीय तरुण आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी परदेशात जात आहेत, कारण ते भारतात आनंदी नाहीत. खरं तर भारतीय तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी आहे. ते अशा ठिकाणी जातात जिथे त्यांना शेवटच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे खूप सोपे वाटते. रघुराम राजन जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये ‘मेकिंग इंडिया ॲन ॲडव्हान्स्ड इकॉनॉमी 2047 : व्हॉट विल इट टेक’ या परिषदेत बोलत होते. (Raghuram Rajan said The mentality of the youth has become like that of Virat Kohli)

गेल्या काही वर्षांत भारतीय तरुणांचं परदेशात स्थायिक होण्याचं प्रमाण वाढलं आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाकरता तरुणाई परदेशात स्थायिक होत आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना रघुराम राजन म्हणाले की, भारतीय तरुण मोठ्या संख्येने आपला व्यवसाय परदेशात सुरू करत आहेत. त्यांना आपला व्यवसाय जागतिक स्तरावर अधिक विस्तार करायचा आहे. त्यामुळे मला वाटतं की, भारतीय तरुणांची मानसिकता विराट कोहलीसारखी आहे. मी जगात कोणाच्याही मागे नाही, असे भारतीय तरुणांना वाटते आहे. कारण आता बरेच भारतीय नवसंशोधक सिंगापूर आणि सिलिकॉन व्हॅली येथे स्थायिक होत आहेत, असा दावा रघुराम राजन यांनी केला.

- Advertisement -

रघुराम राजन म्हणाले की, तरुण पिढीने भांडवल सुधारणा आणि कौशल्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे याबाबत आपल्याला तरुणांशी बोलणं गरजेचं आहे. असं काय आहे जे त्यांना भारतात राहण्याऐवजी परदेशात जाण्यास भाग पाडत आहे. याबाबत आम्ही काही भारतीय तरुणांशी परदेशात स्थायिक होण्याबाबत विचारले असता अनेक तरुण उद्योजकांनी जग बदलण्याची इच्छा व्यक्त केली. तर, त्यापैकी अनेकांनी भारतात आनंदी नसल्याचं कारणही दिलं आहे.

रघुराम राजन म्हणाले की, सरकाराने तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. केवळ अल्पकालीन राजकीय फायद्यासाठी तरुणांना नोकरी देणे योग्य नाही. सरकारने विकेंद्रीकरणासाठी तयार असले पाहिजे, कारण त्याचे फायदे दिल्ली, केरळ आणि तामिळनाडू सारख्या राज्यांमध्ये शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रात दिसून येतील. सरकारला हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, लोकांच्या उन्नतीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रोजगार निर्मिती सुलभ करणे आहे. परंतु आपल्याला आळशी प्रतिसाद ऐकू येतो की, सर्व काही लवकरच चांगले होईल. परंतु भविष्यात आपण खूप पावले उचलू शकत नाही, असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -