घरक्राइमउसनवार घेतलेले पैसे परत न करता महिलेला धमकी

उसनवार घेतलेले पैसे परत न करता महिलेला धमकी

Subscribe

उसनवार घेतलेले पैसे परत न करता संशयित आरोपीने महिलेला कॉल करून खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास बदनामीची धमकी दिली. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात खंडणीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण उर्फ बाळू तानाजी आहिरे (रा. शिंपी गल्ली, वेशीजवळ, चांदवड) असे संशयिताचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार व सुरेखा अशोक जगताप (रा. पेठरोड, तवळी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२२ मध्ये संशयिताने महिलेकडून उसनवार पैसे घेतले होते. महिलेने उसनवार पैसे वारंवार संपर्क साधून परत मागितले होते. परंतु, संशयित दाद देत नव्हता. अखेर गेल्या आठवड्यात संशयिताने उलट महिलेलाच कॉल केला आणि उसनवार पैसे परत न करता खंडणी स्वरुपात जादा पैशांची मागणी केली. तसेच, पैसे न दिल्यास समाजात बदनामी करण्याची धमकीही दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने म्हसरुळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गवारे करीत आहेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -