घरदेश-विदेशगुजराती मूर्ख नाहीत की ते...; पंतप्रधान मोदींच्या भावाचा 'आप'वर हल्लाबोल

गुजराती मूर्ख नाहीत की ते…; पंतप्रधान मोदींच्या भावाचा ‘आप’वर हल्लाबोल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी रविवारी गुजरात विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान आपवर हल्लाबोल केला आहे. राज्यात फक्त भाजप आणि काँग्रेस हे दोनच राजकीय पक्ष राहिले आहेत तिसरा पक्ष नाहीच. मात्र काँग्रेस राज्यात आता शून्य आहे आणि भाजप पूर्ण ताकदीने उतरला आहे. असा दावाही त्यांनी केला आहे. भाजप नेते सुमित सिंह यांच्या निमंत्रणावरून प्रल्हाद मोदी बाराबंकीला पोहोचले होते. यावेळी त्यांनी आद आदमी पक्षावर सडकून टीका केली आहे.

गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर अशा दोन टप्प्यात निवडणुका होणार असून 8 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. गुजरातमधील या निवडणुकीसाठी ‘आप’कडून इसुदान गढवी यांना मुख्यमंत्रीपदासाठी उमेदवार देण्यात आली, गढवी हे खंभलिया मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान प्रल्हाद मोदी पुढे म्हणाले की, देशातील जनतेला त्यांच्या पसंतीचा पंतप्रधान मिळाला असून 2024 मध्येही भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल, भारत लवकरात लवकर विश्वगुरू म्हणून प्रस्थापित व्हावा, अशी प्रार्थना करण्यासाठी मी भगवान श्रीरामाकडे आलो आहे.

प्रल्हाद मोदी म्हणाले की, ‘अरविंद केजरीवाल गुजरातमध्ये पूर्ण ताकदीने उतरले आहेत, मात्र त्यांना यश मिळणार नाही. गांधीनगर येथील महापालिकेची निवडणूकही आम आदमी पक्षाने लढवली आहे. पालिका निवडणुकीत यश मिळेल, असे मीडियाही म्हणत होता, पण गुजरातचा मतदार इतका मूर्ख नाही की तो रेवडी बाजारात फसेल. प्रल्हाद मोदी यांनी अयोध्येतील प्राचीन पीठ बावन मंदिरातही पोहोचून येथील महंत वैदेही वल्लभ शरण यांचे आशीर्वाद घेतले, भोजन प्रसाद घेतला. त्यांनी रामलालाच्या दरबारात हजेरी लावून राम मंदिराचे बांधकाम पाहिले. तसेच त्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून मंदिर उभारणीच्या कामकाजाची माहिती घेतली.


आला थंडीचा महिना! राज्यात हुडहुडी वाढली, तर ‘या’ भागात पावसाचा अंदाज


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -