घरदेश-विदेशSachin Pilot टीमला जोरका झटका, बंडखोर आमदार निलंबित

Sachin Pilot टीमला जोरका झटका, बंडखोर आमदार निलंबित

Subscribe

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत हे सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत केंद्र सरकारचे कोणते लोक सामील आहेत याचा तपासात खुलासा झाला पाहिजे, अशी मागणी केली गेली आहे.

राजस्थानमधील राजकीय नाट्याला वेगळं वळण लागलं असून कॉंग्रेसने बंडखोर आमदारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. कॉंग्रेसचे बंडखोर आमदार भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंग यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. या दोन्ही आमदारांवर भाजप बरोबर काम केल्याचा आणि गेहलोत सरकारला पाडण्याचा आरोप आहे. सचिन पायलट यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, आज राजस्थान सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. याचे काही ऑडिओही समोर येत आहेत, त्यामध्ये राजस्थानमधील कॉंग्रेसचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पत्रकार परिषदेत रणदीप सुरजेवाला यांनी कॉंग्रेस नेते भंवरलाल शर्मा आणि भाजप नेते संजय जैन यांच्यातील संभाषणाविषयी सांगितलं. रणदीप सुरजेवाला म्हणाले की, भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्रसिंग यांना कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यावरून निलंबित करण्यात आलं आहे. पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. काल, माध्यमांनी धक्कादायक टेप दाखवल्या, ज्यात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, भाजप नेते संजय जैन आणि कॉंग्रेसचे आमदार भंवर लाल शर्मा यांनी सरकार पाडण्याबाबत चर्चा केली.

- Advertisement -

सचिन पायलट यांच्याशी झालेल्या चर्चेच्या प्रश्नावर रणदीप सुरजेवाला म्हणाले की, काही टप्प्यावर चर्चा होत आहे, मी याबद्दल काहीही सांगू शकत नाही. ‘सुबह का भुला अगर शाम को घर आ जाए तो उसे भुला नहीं कहते हैं,’ असं सुरजेवाला म्हणाले. पक्ष किंवा वैयक्तिक पातळीवर चर्चा जाहीर करणं योग्य नाही.

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत हे सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सहभागी असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला. त्यांच्याविरोधात त्वरित एफआयआर दाखल करावा आणि अटक करण्यात यावी. या संपूर्ण प्रक्रियेत केंद्र सरकारचे कोणते लोक सामील आहेत याचा तपासात खुलासा झाला पाहिजे. रणदीप सुरजेवाला पुढे म्हणाले की सचिन पायलट यांनी बाहेर येऊन हे सत्य प्रकट करावं आणि आमदारांची यादी द्यावी. ऑडिओमध्ये बोलणार्‍या भंवरलाल शर्मा, विश्वेंद्र सिंग यांना निलंबित करण्यात आलं असून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात एसओजीकडे तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राजस्थानमधील सत्तासंघर्षाला नवं वळण; घोडेबाजाराचे तीन ऑडिओ व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -