Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी ६७ भारतीयांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज, लहान मुलांना कोरोना धोका कमी असल्याने प्राथमिक शाळा...

६७ भारतीयांमध्ये आढळल्या अँटीबॉडीज, लहान मुलांना कोरोना धोका कमी असल्याने प्राथमिक शाळा सुरू करा – ICMR

Related Story

- Advertisement -

सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण यादरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदच्या (ICMR) चौथ्या सीरो सर्वेक्षणातून (Sero Survey-4) दिलासादायक बाब समोर आली आहे. या सीरो सर्वेक्षणानुसार देशातील तब्बल ६७.६ टक्के नागरिकांमध्ये (सुमारे ८६ कोटी) कोरोना अँटीबॉडी निर्माण झाल्या आहेत. म्हणजेच हे नागरिक कोरोनामुक्त झाले आहेत किंवा यांच्यामध्ये लसीमुळे अँटीबॉडीज निर्माण झाली असून अशाप्रकारे यांच्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक क्षमता विकसित झाली आहे. पण ४० कोटींना लोकांना अजूनही कोरोना संसर्गाचा धोका आहे. तसेच लहान मुलांना कोरोनाचा धोका तुलनेने कमी आहे, त्यामुळे शाळा उघडता येतील, असे आयसीएमआरने सांगितले आहे.

काल, मंगळवारी सीरो सर्वेक्षणाची आकडेवारी जारी करत आयसीएमआरने सांगितले की, देशव्यापी चौथ्या सीरो सर्वेक्षणामध्ये ६ वर्षांवरील २८ हजार ९७५ लोकांना सामिल केले होते. यावर्षी जून आणि जुलैमध्ये २१ राज्यातील ७० जिल्ह्यातील नमूने घेतले गेले. प्रत्येक जिल्ह्यातील १० गावाच्या वार्डने प्रत्येकी ४० लोकांचे नमूने घेतले. यामध्ये ६ ते ९ वयोगटातील २ हजार ८९२, १० ते १७ वयोगटातील ५ हजार ७९९ आणि १८ वर्षांवरील २० हजार २८४ लोकांचा समावेश होता. यामध्ये दोन तृतीयांश अँटीबॉडीज (सीरो प्रिवलेंस) आढळले आहेत.

- Advertisement -

आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, ‘ज्या क्षेत्रात अँटीबॉडीज कमी असलेली लोकसंख्या आहे, तिथे तिसऱ्या लाटेचा धोका जास्त आहे. अशा परिस्थिती सामजिक, धार्मिक आणि राजकीय गर्दी टाळली पाहिजे.’

लसीचा एक डोस घेणारे ८१ टक्के लोकं आणि दोन डोस घेतलेले ८९.९ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. तसेच लस न घेणाऱ्या ६२.३ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. या सीरो सर्वेक्षणामध्ये सामील झालेल्या ७ हजार २५२ आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ८५.२ टक्के अँटीबॉडीज आढळल्या आहेत. तर १० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही आहे. ७६.१ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस आणि १३.४ टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

- Advertisement -

डॉ. भार्गव म्हणाले की, ‘लहान मुलं कोरोना व्हायरसवर सहजपणे हाताळत आहेत. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये रिसेप्टरची कमतरता आहे, जिथे कोरोना व्हायरस हल्ला करतो. सीरो सर्वेक्षणात ६ ते ९ वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये जितक्या अँटीबॉडीज आढळल्या आहेत, तितक्याच प्रौढांमध्ये आढळल्या आहेत. युरोपच्या अनेक देशांमध्ये प्राथमिक शाळा बंद केल्या नाहीत. त्यामुळे देशातील अशा परिस्थितीत शाळा खुल्या करण्याचा विचार केला जाऊ शकतो. शाळा सुरू करण्याची सुरुवात प्राथमिक वर्गापासून झाली पाहिजे. त्यानंतर पुढील वर्ग खुले केले पाहिजेत. पण शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक, चालक, कंडक्टरसह इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले पाहिजे. पण शाळा सुरू करण्याचा निर्णय हा राज्य आणि जिल्हास्तरावरील आहे. हा निर्णय पॉझिटिव्हीटी रेट आणि आरोग्य सेवांवर आधारित असेल.’


हेही वाचा – फाळणीनंतर भारतात पहिल्यांदाच ५० लाख मृत्यूला कोरोना जबाबदार – अमेरिकेतील संशोधन


- Advertisement -