घरदेश-विदेशसंसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला बहाल, उपसचिवांनी शेवाळेंना लिहिले पत्र

संसदेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाला बहाल, उपसचिवांनी शेवाळेंना लिहिले पत्र

Subscribe

Shivsena Parliament office | संसदेच्या उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी खासदार राहुल शेवाळे यांना पत्र लिहित संसदेतील कार्यालय ताब्यात घेण्याचे निर्दश दिले आहेत.

Shivsena Parliament office | नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्याने ठाकरे गटाला (Thackeray Group) मोठा धक्का बसला आहे. पक्षनाव आणि पक्षचिन्ह ताब्यात आल्यानंतर शिंदे गट आणखी आक्रमक झाला असून त्यांनी शिवसेनेची कार्यालये ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. काल विधिमंडळातील कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आज संसदेतील शिवसेनेचे कार्यालयही आता शिंदे गटाला मिळाले आहे. संसदेच्या उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी खासदार राहुल शेवाळे यांना पत्र लिहित संसदेतील कार्यालय ताब्यात घेण्याचे निर्दश दिले आहेत.

हेही वाचा मोठी बातमी! शिवसेना आणि धनुष्यबाण घेतल्यानंतर विधिमंडळातील कार्यालयावरही शिंदे गटाचा कब्जा

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर महाराष्ट्रात सत्तासंघर्ष निर्माण झाला. हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. तर, पक्षाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच्या दरबारी होता. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला धक्का देत शिंदे गटाच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेले. यावरून शिंदे गटात कमालीचा आनंद पसरला असून ठिकठिकाणी जल्लोष सुरू आहे. दरम्यान, संपूर्ण पक्षाचा ताबा शिंदे गटाकडे आल्याने त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयांवरही ताबा मिळवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, विधिमंडळातील शिवसेना कार्यालयात प्रताप सरनाईक यांनी प्रवेश करत ताबा मिळवला. त्यानंतर, मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयही ताब्यात मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे कार्यालय आधीच सील करण्यात आले आहे. तरीही मुंबई महापालिकेवर काल छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते.

महाराष्ट्रातील शिवसेना कार्यालयांबाबत या घडामोडी घडत असताना संसदेतील शिवसेना कार्यालयही शिंदे गटाला मिळाले आहे. संसदेतील शिवसेना कार्यालयात शिंदे आणि ठाकरे गटाकडून वापरण्यात येत होता. वाद सुरू झाल्यानंतरही दोन्ही गटातील सदस्य एकाच कार्यालयात बसत होते. परंतु, आता लोकसभा सचिवालयाने शिवसेना शिंदे गटाला हे कार्यालय दिले आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेचे कार्यालय सील

मुंबई महापालिकेची मुदत संपल्याने आजी नगरसेवक माजी नगरसेवक झाले. मात्र निवडणूक होईपर्यंत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, सर्वच पक्षांच्या माजी नगरसेवकांना व गटनेते आदींना पक्ष कार्यालय वापरता यावे, यासाठी खुले ठेवले होते. येथील शिवसेनेचे पक्ष कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पत्रकार परिषद घेणे सुरू करण्यात आले. माजी नगरसेवक दररोज या पक्ष कार्यालयात येऊन बसू लागले व चर्चा वगैरे करू लागले. हे सर्व सुरू असतानाच २९ डिसेंबर रोजी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, उपनेते यशवंत जाधव, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, प्रवक्त्या शीतल म्हात्रे आदींनी मुंबईतील विकासकामांच्या निमित्ताने पालिका मुख्यालयात आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेतली. त्यानंतर या सर्वांनी पालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात जाऊन ठाण मांडले. त्यावेळी पक्ष कार्यालयात फक्त कर्मचारी वगळता उद्धव ठाकरे गटाचे कोणीही उपस्थित नव्हते. मात्र या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, आशिष चेंबूरकर, माजी नगरसेवक सचिन पडवळ, रमाकांत रहाटे, सदानंद परब आदींनी पक्ष कार्यालयात धाव घेतली. त्यानंतर तिथे वादाला तोंड फुटले.

हेही वाचा – शिवसेनेतील अंतर्गत संघर्षाचा परिणाम, मुंबई मनपातील सर्व पक्षांची कार्यालये सील

या सर्व प्रकारानंतर पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी सर्व पक्षांची कार्यालये सील करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या राड्यात भाजप, समाजवादी राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेस या सर्वच पक्षांना मोठा व नाहक फटका बसला आहे. आता मुंबई मनपाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरच कदाचित ही कार्यालये खुली करण्यात येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -