Saturday, February 20, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मोदी गुरुद्वारात गेले त्यामागे राजकारण - सामना अग्रलेख

मोदी गुरुद्वारात गेले त्यामागे राजकारण – सामना अग्रलेख

Related Story

- Advertisement -

एकाबाजूला कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांच अजूनही आंदोलन सुरू आहे. याच दरम्यान २० डिसेंबरला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी अचानक दिल्ली असलेल्या रकाबगंज गुरुद्वाराला भेट दिली. मोदींनी रकाबगंज गुरुद्वारात नतमस्तक होऊन गुरु तेग बहादूर यांना नमन केलं. याच पार्श्वभूमीवरून आजच्या सामना अग्रलेखात विरोधकाच्या पडद्या आडून सेनेने मोदींवर निशाणा साधला आहे. ‘भडकलेल्या शिखांच्या भावनांनवर फुंकर मारण्याचा प्रयत्न मोदींनी केला, असे म्हटले जात आहे. शिवाय, मोदी गुरुद्वारात गेले त्यामागे राजकारण आहे. शिखांविषयी इतकेच प्रेम होते तर पंजाबच्या शेतकऱ्यांना एक महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर का उभे केले आहे? शिखांच्या अन्नधान्याचे, पोटापाण्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत आणि शिखांच्या गुरुंसमोर नतमस्तक व्हायचे, हे नाटक आहे, असे विरोधक म्हणत असतीलही, पण मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करू नये, अशा प्रकारची विरोधकांची मते मांडून सामनाने पडद्या आडून मोदींवर टीका केली आहे.

तसेच दिल्लीतील रकाबगंज गुरुद्वारात पंतप्रधान मोदी अचानक गेले. गुरू तेगबहादूर यांच्या समाधीपुढे त्यांनी माथे टेकवले. यात अस्वस्थ होण्यासारखे काय आहे? मोदी यांनी कोणतीही कृती केली तरी ते नाटक किंवा ढोंगच आहे, असे मानून विरोधक टीका करतात. हे काही योग्य नाही. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना अनेकदा मंदिर, मशीद, गुरुद्वारात गेल्याच आहेत. ईदचा शिरकुर्मा आणि बिर्याणी तर अनेकांनी चापली आहे, पण मोदी यांच्याबाबतीत विरोधक वेगळी भूमिका घेतात याचे आश्चर्य वाटते, असं सामना अग्रलेखात सेनेने म्हटले आहे.

मोदींच्या गुरुद्वार भेटीवर अजून काय लिहिले आहे सामनाच्या अग्रलेखात?

- Advertisement -

गेल्या एक महिन्यापासून पंजाबचा शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करतो आहे. हा शेतकरी ‘शीख’ म्हणजे लढवय्या समाज आहे. देशाच्या रक्षणासाठी शिखांचे योगदान मोठे आहे. अशा शिखांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर सुरू असतानाच पंतप्रधान रकाबगंज गुरुद्वारात अत्यंत साधेपणाने गेले. पोलिसी सुरक्षेचा लवजमा दूर ठेवून ते गुरुद्वारात गेले आणि तेगबहादूर यांच्या समाधीपुढे दंडवत घातला. पंतप्रधान मोदी यांनी केशरी पगडी घालून सामान्य नारकिांप्रमाणे दर्शन घेतले. असे सांगतात की, पंतप्रधान येत आहेत याची आगाऊ कल्पना गुरुद्वार प्रबंधकांना नसल्याने मोदींना पाहून त्यांनाही धक्काच बसला. मोदी यांच्या आगमनामुळे इतर श्रद्धाळूंना त्रास होऊ नये, याची काळजी घेतली गेली. मोदी यांनी अत्यंत भक्तिभावाने गुरुंचे दर्शत घेतले, असे सामनात म्हटले आहे.

पण मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करू नये

पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी गुरुद्वारे भेटीतून शिकांचे मन जिंकण्याचा प्रयोग केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पंजाबचा शीख समुदाय नाराज आहे. तो मोदींविरोधी घोषणा देत आहे. या पंजाबच्या शेतकऱ्यांना अतिरेकी, खलिस्तानी वगैरे ठरवून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे भडकलेल्या शिखांच्या भावनांनवर फुंकर मारण्याचा प्रयत्न मोदींना केला, असे आता म्हटले जात आहे. शिवाय, मोदी गुरुद्वारात गेले त्यामागे राजकारण आहे. शिखांविषयी इतकेच प्रेम होते तर पंजाबच्या शेतकऱ्यांना एक महिन्यापासून कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर का उभे केले आहे? शिखांच्या अन्नधान्याचे, पोटापाण्याचे प्रश्न सोडवायचे नाहीत आणि शिखांच्या गुरुंसमोर नतमस्तक व्हायचे, हे नाटक आहे,’ असे विरोधक म्हणत असतीलही, पण मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करू नये, असे म्हणतं सामन्याच्या अग्रलेखातून विरोधकच्या पडद्या आडून मोदींवर निशाणा साधला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – चिपी विमानतळाचे नामकरण वाद आधी विमानतळ सुरू करा,मग नाव द्या -मुख्यमंत्री


 

- Advertisement -