घरदेश-विदेशSingapore : भारतीय वंशाच्या महिलेला सिंगापूरमध्ये 16 आठवड्यांचा तुरुंगवास; 'हे' आहे कारण

Singapore : भारतीय वंशाच्या महिलेला सिंगापूरमध्ये 16 आठवड्यांचा तुरुंगवास; ‘हे’ आहे कारण

Subscribe

सिंगापूरमध्ये 37 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेला तिच्या घरकाम करणाऱ्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी 16 आठवड्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला तिच्या कामावर खूश नव्हती.

सिंगापूरमध्ये 37 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेला तिच्या घरकाम करणाऱ्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी 16 आठवड्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिला तिच्या कामावर खूश नव्हती. ( Singapore Indian origin women jailed for 16 weeks in singapore accused of tourturing domestic helper)

मोनिका शर्मा असे या आरोपी महिलेचे नाव आहे. ज्या घरकाम करणाऱ्या महिलेचा ती छळ करत होती, तीदेखील भारतीय वंशाची होती. ही आरोपी महिला 25 वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेच्या तोंडावर उलटीदेखील करायची. पीडित महिला 20 जानेवारी 2021 पासून रिव्हर व्हॅली रोडजवळील कॉन्डोमिनियम अपार्टमेंटमध्ये काम करत होती. एप्रिल 2021 मध्ये घरकाम करणारी महिला खेळणी साफ करत होती, त्यावेळी आरोपी महिला, मोनिका शर्मा तिच्यावर जोरजोरात ओरडली आणि तिच्या गालावर तीन मुक्केदेखील मारले. त्यावेळी त्या आरोपी महिलेचा पती तेथे उपस्थित होता, भांडण मिटवून त्याने पत्नीच्या वतीने पीडितेची माफी मागितली. मात्र, भांडण मिटवण्याऐवजी महिलेने पीडितेच्या डोक्यात खेळण्याने वार केले.

- Advertisement -

उप सरकारी वकील (डीपीपी) आर अरविंद्रेन यांनी सांगितले की, घरकाम करणाऱ्या महिलेला गंभीर दुखापत झाली आहे आणि डाव्या डोळ्याला सूजही आली आहे. पीडितेने जखमांचे फोटो काढून भारतातील तिच्या एजंटकडे पाठवले. त्यानंतर एजंटने ती छायाचित्रे सिंगापूरमध्ये असलेल्या त्याच्या जवळच्या मित्रांना पाठवली. या छायाचित्रांमुळे सिंगापूर पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी आरोपी महिलेवर कारवाई केली.

( हेही वाचा: Imran Khan arrest : इम्रान खान यांची मुक्तता; सुप्रीम कोर्ट म्हणाले, अटक बेकायदा )

- Advertisement -

डीपीपीने या महिलेला पाच महिन्यांची शिक्षा देण्याची विनंती न्यायालयाला केली होती. दुसरीकडे, बचाव पक्षाचे वकील अमरजीत सिद्धू यांनी न्यायालयाला सांगितले की आरोपी महिला तणावग्रस्त असते आणि तिच्यावर मानसशास्त्र केंद्रात उपचार सुरू आहेत. न्यायालयाने या महिलेला 16आठवड्यांची शिक्षा सुनावली आहे.

सिंगापूरमध्ये यापूर्वीही कौटुंबिक हिंसाचाराची नोंद झाली आहे. याच वर्षी मार्चमध्ये एका 38 वर्षीय भारतीय वंशाच्या महिलेला तिच्या सहकाऱ्यावर हल्ला केल्याबद्दल 10 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -