घरदेश-विदेशदेवरिया बालिकागृहाचे दरवाजे पुन्हा उघडले!

देवरिया बालिकागृहाचे दरवाजे पुन्हा उघडले!

Subscribe

सामूहिक विवाह योजनेंतर्गत अटकेत असलेली आरोपी गिरिजा त्रिपाठीने अंसारी रोड येथील आशिष यांच्या दुकानातून भांडी घेतली होती. तपासावेळी त्याला देखील सोबत ठेवण्यात आले होते.

देवरिया बालिकागृहातील प्रकाराचा तपास करणाऱ्या SITसमोर अनेक नव्या गोष्टींचा खुलासा होत आहे. मुलींचा सामूहिक विवाह, खोटी दत्तक कागदपत्रे यांनी SIT हैराण झालेली असताना रविवारी अधिक तपासासाठी पुन्हा एकदा देवरिया येथील बालिकागृहात पोहोचली.ऑगस्ट महिन्यात सील करण्यात आलेल्या या बालिकागृहाचे दरवाजे रविवारी तपासासाठी SITने उघडले. दंडाधिकाऱ्याच्या उपस्थित हा सगळा तपास करण्यात आला. तब्बल ७ तास चालेल्या या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

वाचा हे संपूर्ण प्रकरण काय आहे? 

काय लागले हाती?

बालिका गृहातील मुलींची लग्ने त्यांना न सांगता फसवून त्यांच्याहून मोठ्या वयांच्या पुरुषांशी करण्यात आली होती हे SITला कळाले होते. विशेष म्हणजे सामूहिक पद्धतीने त्यांचा विवाह लावून देण्यात आला. बालिका गृहात या संदर्भातील पुरावे सापडले असून लग्नासाठी विकत घेतलेली भांडी या ठिकाणी सापडली आहेत. यात पाच नवे कुकर आणि अन्य सामान देखील आहे. हा तपास पूर्ण झाल्यानंतर बालिका गृहाला पुन्हा सील लावण्यात आले.

- Advertisement -
हे माहित आहे का ? देवरिया बालिका गृह प्रकरण: बळजबरीने केली मुलींची लग्न

दुकानदाराने ओळखली भांडी

सामूहिक विवाह योजनेंतर्गत अटकेत असलेली आरोपी गिरिजा त्रिपाठीने अंसारी रोड येथील आशिष यांच्या दुकानातून भांडी घेतली होती. तपासावेळी त्याला देखील सोबत ठेवण्यात आले होते.  बालिका गृहातून सापडलेली भांडी ही आपल्याच दुकानातून घेतल्याचे त्याने सांगितले.तसेच मुख्य आरोपी गिरिजा त्रिपाठीच्या संस्थेत काम करणाऱ्या प्रमिलाने या भांडी खरेदी संदर्भातील कागदपत्रे SIT दिली. या कागदपत्रातील हिशोबातही गोलमाल असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या शिवाय अनय अनेक गोष्टी तपासावेळी हाती लागल्या आहेत.

वाचा- देवरिया बालिका गृह प्रकरण : ३ मुलांची परदेशात विक्री?

पोस्टमार्टम रिपोर्टही सापडले

बालिका गृहातील दोन मुलींचे पोस्टमार्टम रिपोर्टही येथे सापडले असून त्यातून अनेक गोष्टी समोर येतील असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे.

 येथेही मुलींवर झाले होते अत्याचार 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -