घरताज्या घडामोडीनिवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं आकलन करण्यासाठी सोनिया गांधींकडून ५ नेत्यांची नियुक्ती, जाणून घ्या

निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं आकलन करण्यासाठी सोनिया गांधींकडून ५ नेत्यांची नियुक्ती, जाणून घ्या

Subscribe

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पराभवानंतर परिस्थितीचे आकलन करण्यासाठी पाच वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केली आहे. तसेच निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्याचे सुचवले आहेत. यामध्ये खासदार आणि आमदारांचा देखील समावेश आहे.

राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना गोव्यातील आणि जयराम रमेश यांना मणिपूरमधील परिस्थितीचे आकलन करण्यास सांगितले आहे. यावेळी, मुल्यांकनाची जबाबदारी अजय माकन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जिथे काँग्रेसचा आम आदमी पक्षाकडून पराभव झाला होता. काँग्रेस नेते जितेंद्र सिंह उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं आकलन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अविनाश पांडे यांना उत्तराखंडमध्ये अशाच प्रकारचं काम करण्यास सांगितलं आहे.

- Advertisement -

काँग्रेस अध्यक्षांनी निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आमदार-उमेदवार आणि प्रमुख नेत्यांकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे राज्यांमध्ये संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी नेत्यांची नियुक्ती केली आहे, असे अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने खराब कामगिरी केली आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये भाजप पक्षाला कोणताही पक्ष टक्कर देऊ शकला नाही. पाच राज्यांमध्ये काँग्रेसचा झालेला पराभव हा पक्षाला चांगलाच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे. पंजाबसारखं राज्यही आपनं काँग्रेसच्या हातातून काढुन घेतलं असून गोव्यातही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे सोनिया गांधींनी या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता. यामध्ये पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू यांचा समावेश होता.

- Advertisement -


हेही वाचा : Devendra Fadnavis road show in nagpur : २०२४ मध्ये भाजपचंच सरकार येणार, देवेंद्र फडणवीसांचा दावा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -