घरट्रेंडिंगHoli Special Bhaang Pakora: होळीनिमित्त तयार करा 'भांग पकोड्याची' स्वादिष्ट रेसिपी

Holi Special Bhaang Pakora: होळीनिमित्त तयार करा ‘भांग पकोड्याची’ स्वादिष्ट रेसिपी

Subscribe

कोरोनामुळे गेली २ वर्ष देशात होळीचा उत्साह मावळला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला असून निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. होळीचा सण हा खाण्या-पिण्याचा आणि रंगांची उधळण करण्याचा सण आहे. होळीनिमित्त अनेकजण घरात चविष्ट पदार्थ करत असतात. यामध्ये काही लोकांना भांगसंबंधित पदार्थ करण्याची आवड असते. जर तुम्हीसुद्धा भांगशी संबंधित पदार्थ करत असाल तर एकदा भाग पकोडा नक्की बनवा. होळीच्या सणाला लोकांना भांगपासून बनलेले पदार्थ अधिक आवडत असतात त्यामुळे त्यांचा अधिक कल हा भांगपासून बनवण्यात आलेल्या पदार्थांकडे असतो. यावेळी भांग पकोडा हा झटपट तयार करता येणारा पदार्थ आहे.

कशी बनवला भांग पकोडा रेसिपी

१ कप चन्याचे पीठ
१ चमचा मीठ
१/२ चमचा हळद
१/२ चमचा लाल मिर्ची पावडर
१ चमचा आमचुर
१ चमचा भांगच्या पानाची पेस्ट
१२५ ग्रॅम गोल आकारात कांदा कापून घ्या
१२५ ग्रॅम गोल आकारात कापलेले बटाटे
तळण्यासाठी तेल

- Advertisement -

भांग पकोडा तयार करण्याची रेसिपी

भांग पकोडा तयार करण्यासाठी सगळ्यात पहिले पकोडा करण्यासाठी जे साहित्य तयार ठेवलय त्याचे मिश्रण करुन घ्यावे आणि त्याची पेस्ट करावी. यामध्ये गरजेपुरते पाणी मिसळावे. आता मिश्रणात कापून ठेवलेले कांदे आणि बटाट्याचे काप टाकावे. सोबतच भांगची पेस्टसुद्धा मिश्रण करुन घ्यावे. बाजूला गॅसवर एका कडईमध्ये तेल गरम करण्यास ठेवावेव. भजीप्रमाणेच भांगच्या पकोडा करण्यासाठी कढईत १-१ स्कूप बॅटर भांग पकोडा बॅटर टाकावे. पकोडा सोनेरी आणि थोडं लालसर होईपर्यंत तळून एका प्लेटमध्ये काढावे. यानंतर हिरव्या चटणीसोबत गरमा-गरम खाण्यासाठी द्यावे. तर अशा प्रकारे नक्की करा झटपट भांग पकोडा रेसिपी.


हेही वाचा : Holi 2022 : केस, चेहरा आणि नखांवरील रंग निघत नसल्यास ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -