सोनिया गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीला हजर राहणार नाहीत, ईडीकडे मागितला अधिकचा वेळ

राहुल गांधी परदेशात होते त्यामुळे त्यांना १३ जून रोजी ईडीसमोर हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सोनिया गांधी यांची ८ जून रोजी चौकशी होणार आहे. पंरतु सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली आहे.

Sonia Gandhi will not attend EDs inquiry

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता कमी आहे. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. ईडीने सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सोनिया गांधी यांचा अहवाल निगेटिव्ह आला नाही. यामुळे त्या विलगीकरणातच आहेत. ८ जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश होते. परंतु कोरोनामुळे त्या चौकशीला हजर राहणार नाहीत. असे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीने नॅशलन हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी समन्स जारी केलं आहे. ८ जून रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर रहावे असे आदेश देण्यात आले आहेत. राहुल गांधी परदेशात होते त्यामुळे त्यांना १३ जून रोजी ईडीसमोर हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर सोनिया गांधी यांची ८ जून रोजी चौकशी होणार आहे. पंरतु सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर प्रियांका गांधी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करण्यात येणार आहे. सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा नकारात्मक अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. यामुळे त्या उद्या चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी आहे. सोनिया गांधी यांनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी अधिकचा वेळ मागितला असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रकरण काय आहे ?

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ५५ कोटींचा गैरव्यवहार झाला होता. याबाबत गंभीर आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. २०१२ मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी एक याचिका दाखल करून काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे आरोप केले होते. २००८ मध्ये एजेएलजी सर्व प्रकाशनं बंद करण्यात आली होती. तसेच या एजेएल कंपनीवर ९० कोटींचं कर्जही झालं होतं. त्यानंतर काँग्रसने यंग इंडियन प्रायव्हेट लमिटेड नावाने एक नवी अव्यवसायिक कंपनी बनवली. त्यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासहीत मोतीलाल व्होरा, सुमन दुबे, ऑस्कर फर्नांडिस आणि सॅम पित्रौदा आदी नेते या कंपनीत संचालक होते.


हेही वाचा : कोणत्याही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यास आमदारकी जाणार नाही, पण…