घरदेश-विदेशक्षणभरात घडलं, मग जखमी पत्नीला रुग्णालयातही नेलं; SCने आरोपीची शिक्षा केली कमी

क्षणभरात घडलं, मग जखमी पत्नीला रुग्णालयातही नेलं; SCने आरोपीची शिक्षा केली कमी

Subscribe

मुलीने दिलेल्या कबुलीजबाबात सर्वोच्च न्यायालयाला महत्त्वाचा धागा सापडल्याने आरोपीची शिक्षा कमी करण्यात आली. 

नवी दिल्ली – रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याप्रकरणी ट्रायल कोर्ट आणि दिल्ली उच्च न्यायालायने आयपीएस कलम ३०२ अंतर्गत शिक्षा सुनावली होती. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेल्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या शिक्षेत कपात केली आहे. मुलीने दिलेल्या कबुलीजबाबात सर्वोच्च न्यायालयाला महत्त्वाचा धागा सापडल्याने आरोपीची शिक्षा कमी करण्यात आली.

हेही वाचा – तारीख पे तारीख…, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर

- Advertisement -

जय करण यादव याच्यावर पत्नीच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. त्यांच्या सात वर्षांच्या मुलीसमोरच ही हत्या घडली होती. ट्रायल कोर्टाने त्याला याप्रकरणी आयपीएस कलम ३०२ अंतर्गत शिक्षा दिली होती. दिल्ली उच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. आरोपीने हत्या केली असली तरीही जे घडलं ते क्षणभरात घडलं असा युक्तीवाद जय किरण याच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात केला.

हेही वाचा – कॉलिजियम वाद : केंद्राच्या दिरंगाईमुळे दूरगामी परिणामांची शक्यता, SCने फटकारले

- Advertisement -

आरोपी जय करण यादव याचं त्याच्या पत्नीसोबेत काही कारणावरून वाद झाला. या वादादरम्यान, पत्नीने असं काहीतरी म्हटलं की ज्यामुळे जय करण यादव याला राग अनावर झाला. आणि या रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीला मारायला सुरुवात केली. या मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली. त्यामुळे पतीनेच तत्काळ तिला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात जाण्याआधीच त्याच्या पत्नीचं निधन झालं. हे सर्व त्यांच्या सात वर्षांच्या मुलीसमोर घडलं. त्यामुळे या मुलीची साक्ष सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरली. तसंच, ट्रायल कोर्ट आणि दिल्ली उच्च न्यायालायने दिलेल्या निर्णयाचा विचार करत मुलीने दिलेल्या साक्षाचाही गांभीर्याने विचार करण्यात आला.

हेही वाचा – बळजबरीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी पावले उचलणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्धार

पत्नीची हत्या करणं हा पतीचा पूर्वनियोजित कट नव्हता. जे काही घडलं ते क्षणभरात घडलं. आपल्या चुकीची जाणीव होताच आरोपीने पत्नीला रुग्णालयातही दाखल केलं, असं न्यायमूर्ती एएस बोपन्ना आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने म्हटलं. त्यामुळे ट्रायल कोर्ट आणि दिल्ली हायकोर्टाने दिलेली शिक्षा रद्द करत आरोपीला आयपीएस कलम ३०४ पार्ट २ शिक्षा सुनावण्यात आली. कारण, या आरोपीने आधीच याप्रकरणात १२ वर्षांची शिक्षा भोगली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -