Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश राजदीप सरदेसाईंवर कारवाई नाही, सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

राजदीप सरदेसाईंवर कारवाई नाही, सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

Related Story

- Advertisement -

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई नेहमी अनेक घटनांवर ट्विटरच्या माध्यमातून आपले परखड मांडत असतात. यातच ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांच्यासंबंधी केलेल्या एका ट्विटर पोस्टमुळे वादात सापडले होते. त्यानंतर कालपासून पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टान अवमान केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल केल्याच्या काही बातम्या प्रसिद्ध होत होत्या. परंतु आता राजदीप सरदेसाई यांच्याविरूद्ध अवमानाचा गुन्हा दाखल केलेला नाही, असं निवेदन सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारने जाहीर केलं आहे. कोर्टाच्या वेबसाईटवर चुकीने ही माहिती पडली होती, ती आता दुरुस्त करण्यात आली आहे. असे स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले.

सुप्रीम कोर्टाचे उप रजिस्ट्रार राकेश शर्मा यांनी याबाबतची माहिती स्पष्ट केली आहे. सुप्रीम कोर्टाद्वारे राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात सुओमोटो पद्धतीने न्यायालयाच्या अपमानाबद्दल कारवाई केली जाणार असल्याची माहिती काही माध्यमांनी प्रसिद्ध केली होती. परंतु या प्रकारचा कोणताही खटला सरदेसाईंविरुद्ध दाखल केलेला नाही असे राकेश शर्मा यांनी स्पष्ट केले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर खटला क्रमांक एसएमसी (सीआरएल) 02/2021 च्या संबंधात दिसत असलेला खटला चुकीचा असून यामध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. असेही त्यांनी सांगितले. (rajdeep sardesai twitter)

नेमका काय आहे वाद?
- Advertisement -

कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने १ रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तसेच दंड न भरल्यास तीन महिने कोर्टाच्या केस लढवण्यापासून रोखले होते. यावर राजदीप सरदेसाई यांनी जुलै महिन्यात ट्विट करत आपले मत मांडले. यात त्यांनी सुप्रीम कोर्ट कोणलाही वकीली करण्यापासून रोख शकत नाही असे स्पष्ट म्हंटले होते. यानंतर याचिकाकर्त्याने सरदेसाईंच्या या ट्विटवर आक्षेप घेत माननीय न्यायालयावर अशाप्रकारचे हल्ले करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हे तर न्यायालयाचा हेतुपुरस्पर केलला अपमान आहे. असे म्हटलं होत.

- Advertisement -

 


हेही वाचा- रेल्वेची परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा अपघात; ४७ जणांचा मृत्यू

 

 

- Advertisement -