घरताज्या घडामोडीकेरळमधील लहानमुलांमध्ये आढळली 'टोमॅटो फ्लू'ची लक्षणं

केरळमधील लहानमुलांमध्ये आढळली ‘टोमॅटो फ्लू’ची लक्षणं

Subscribe

कोरोनाचा आजार अजून संपला नाही तोपर्यंत आता अजून एका नवीन आजाराची भर पडल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. ही चिंताजनक बातमी केरळमधून समोर आली असून आता जवळपास भारतातल्या अनेक राज्यांमध्ये या आजाराची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या नव्या फ्लूचे नाव टोमॅटो फ्लू असे असून या विषाणूचे अनेक लहान मुलांना गवसणी घातलेली आहे. या आजाराने बाधित असलेल्या मुलांमध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश जास्त प्रमाणात होत आहे.

टोमॅटो फ्लू म्हणजे काय?
टोमॅटो फ्लूमध्ये न कळून येणारा ताप येतो आणि हळूहळू यामध्ये अंगावर फोड्या , पुरळ येतात. या खुणा लाल रंगाच्या असतात. त्यामुळे याला टोमॅटो फ्लू असे म्हटले जात आहे. केरळच्या अनेक भागांमध्ये या आजराची लक्षणं दिसून आली आहेत. हा आजार पुढे अजून जास्त प्रमाणात पसरू नये म्हणून केरळच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

८० पेक्षा जास्त मुलं टोमॅटो फ्लूने हैराण
केरळमध्ये जवळपास ८० पेक्षा जास्त मुलं टोमॅटो फ्लूने बाधित झालेले आढळून आले आहेत. केरळमध्ये मुलांना ताप, पुरळ आणि इतर समस्या आढळल्यास त्यांची तपासणी केली जात आहे.

  • या फ्लूच्या लक्षणामध्ये जास्त प्रमाणात ताप येतो, थकवा जाणवतो, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंक यांसारखी लक्षण जाणवतात.
  • तसेच शरिरावर लाल पुरळ, लाल फोड येतात. शिवाय त्वचेची जास्त प्रमाणात जळजळ होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -