Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश आंबा चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण, शेणही घातले खाऊ!

आंबा चोरल्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण, शेणही घातले खाऊ!

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कठोर कारवाई

Related Story

- Advertisement -

तेलंगणातून एक निर्दयीपणाचा कळस गाठल्याची घटना समोर आली आहे. ही घटना वाचल्यास तुम्हाला देखील धक्का बसेल. तेलंगणाच्या मेहबुबाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोन सुरक्षा रक्षकास अटक करण्यात आली आहे. दोघेही अल्पवयीन मुलं आंब्यांच्या बागेत शिरले होते, त्यानंतर पहारेकऱ्यांनी त्यांना अडवले. या दोन्ही मुलांचे हात पाय बांधून त्यांना निर्दयपणे मारहाण केली. इतकेच नव्हे तर जबरदस्तीने शेण खाऊ घालण्याचा प्रयत्न देखील केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

असा घडला प्रकार

मेहबुबाबादच्या थोरूर भागात, १३ वर्षाच्या आणि १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलांना आंबा खाण्याचा मोह अनावर झाला आणि त्यांनी नजर चूकवून आंब्यांच्या बागेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी त्या बागेतील काही आंबे तोडले. तेथील दोन सुरक्षा रक्षकांनी त्यांना पाहिले आणि त्यांना पकडले,असा आरोप केला जात आहे. यानंतर दोन्ही रक्षकांनी या अल्पवयीन मुलांचे हात पाय दोरीने बांधले आणि त्यांना काठीने बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्यांना जबरदस्तीने शेण खाऊ घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात पोलिसांनी मुलांशी संवाद साधल्यानंतर पोलिसांच्या तक्रारीच्या आधारे त्यांच्या रक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बघा व्हिडिओ

- Advertisement -

पोलिसांनी दोन्ही सुरक्षा रक्षकांना कलम ३४२ आणि ३२४ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात मुलांनी असे सांगितले की, ते आंबा खाण्यासाठी आंब्याच्या बागेत शिरले नव्हते तर ही मुलं आपला हरवलेला कुत्रा शोधण्यासाठी बागेत फिरत होते. अल्पवयीन मुलांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. यावेळी प्रत्येकजण सुरक्षारक्षकांवर कठोर कारवाई व्हावी, असे देखील सांगत होता.

- Advertisement -

 

- Advertisement -