घरदेश-विदेशसर्वाधिक उष्ण राज्यात आहे सर्वाधिक थंड शहर, भारतातील हे ठिकाण कुठंय?

सर्वाधिक उष्ण राज्यात आहे सर्वाधिक थंड शहर, भारतातील हे ठिकाण कुठंय?

Subscribe

सीकरच्या डोंगराळ भागात थंडी वाढल्याने येथे धुकेही वाढले आहेत. १५ दिवसांपासूनच येथे धुके पसरले होते. देशातील हा असे एक शहर आहे जिथे देशातील सर्वांत जास्त उष्णता असते तर, थंडीत हे सर्वांत थंड शहर असतं.

जयपूर – जगभरात अशी अनेक शहरं आहेत जिथे सर्वाधिक गरमी असते. तर काही ठिकाणी सर्वाधिक थंडी असते. भारतात तर असं शहर आहे, जिथं सर्वाधिक गरमी असते तिथेच सर्वाधिक थंडी असते. राजस्थानमधील शेखावटी शहर यासाठी प्रसिद्ध आहे.

हेही वाचा – इंडोनेशियात भूकंपाचा तीव्र हादरा; ४६जणांचा मृत्यू, ७०० जण जखमी

- Advertisement -

भारतात हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. राजस्थानच्या फतेहपूर शेखावटीच्या तापमानात तेजीने घट होत आहे. आज येथे सर्वाधिक कमी तापमान ५.६ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. शेखावटी हे शहर राजस्थानमधील सर्वाधिक थंड शहर ठरले आहे.

सीकरच्या डोंगराळ भागात थंडी वाढल्याने येथे धुकेही वाढले आहेत. १५ दिवसांपासूनच येथे धुके पसरले होते. देशातील हा असे एक शहर आहे जिथे देशातील सर्वांत जास्त उष्णता असते तर, थंडीत हे सर्वांत थंड शहर असतं.

- Advertisement -

हेही वाचा – बाजवांच्या मुलाशी लग्न करण्याआधीच मुलगी झाली अब्जाधीश, मोठी बाब उघडकीस

गेल्या आठवड्यात एका रात्रीत येथे तापमानात घट झाली होती. सोमवार १४ नोव्हेंबर रोजी १४.५ अंश सेल्सिअस होते. तर, मंगळवारी रात्री हेच तापमान ७ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. एका रात्रीत येथील तापमान ७ अंश सेल्सिअसवर पोहोचले असले तरीही गेल्यावर्षी यापेक्षा अधिक थंडी होती. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबरला कमीत कमी तापमान ४ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. दरम्यान, सध्या वातावरणात घट होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -