घरदेश-विदेशअयोध्याप्रकरणी सुनावणी १० जानेवारीला होणार

अयोध्याप्रकरणी सुनावणी १० जानेवारीला होणार

Subscribe

अयोध्या प्रकरणावर आज महत्वपूर्ण सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या १० जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सुनावणीबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. अवघ्या ५ सेकंदामध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला आहे. तीन नव्या न्यायाधिशांच्या खंडपीठासमोर पुढील सुनावणी होणार आहे. पुढील दोन दिवसामध्ये नवीन खंडपीठाची निश्चिती होणार आहे.  आता १० जानेवारीला नेमकी काय सुनावणी होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे प्रकरण?

राम मंदिराच्या जागेसंबंधी आज महत्त्वाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात होणार होती. सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायमुर्तींच्या खंडपीठाने ही सुनावणी होणार होती. राम मंदिराचा प्रश्न गेल्या ६५ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. राम मंदिर प्रश्नावरुन देशात बराच गदारोळ झाला. दरम्यान या मंदिराच्या जागेसंबंधी महत्त्वाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार होती. राम मंदिरप्रकरणाची सुनावणी आता शेवटच्या टप्प्यावर आली असल्याचे म्हटले जात होते. परंतु, या प्रकरणावर लवकर सुनावणी होईल असे दिसत नाही. नोव्हेंबरमध्ये या राम मंदिराच्या जागेसंबंधित याचिकांवर लवकर सुनावणी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. न्यायालयाकडे इतर अन्य प्रकरणेही असल्याचे कारण सांगत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणासंबंधित याचिकेवर जानेवरी महिन्यात सुनावणी देणार असे म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा – ‘राम मंदिरासाठी हिंदू समाज आणखी प्रतिक्षा करु शकत नाही’

ही आहे याचिका

३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने २.७७ एकर जमीन तीन पक्षकारांमध्ये वाटण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांचा समावेश होता. या तिघांध्ये समान वाटप करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात १४ पेक्षा जास्त याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ९ मे २०११ रोजी या निर्णयाला स्थगिती दिली होती.

- Advertisement -


हेही वाचा – राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू – स्वामी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -