घरदेश-विदेशतिबेटमधील न्यिंगचीमध्ये हिमस्खलन, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

तिबेटमधील न्यिंगचीमध्ये हिमस्खलन, 8 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Subscribe

बिजिंगः तिबेट येथील दक्षिण-पश्चिम क्षेत्रातील न्यिंगची येथे हिमस्खलन झाले आहे. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे शव शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झाले आहे. या हिमस्खलनामध्ये हरवलेल्या नागरिकांचा शोध सुरु आहे. चीन सरकारने मदतकार्यासाठी येथे विशेष पथक पाठवले आहे.

मेनलिंग काउंटीमधील पाई गावात व मेडोग काउंटी येथील डोक्सोंग येथे मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास हिमस्खलन सुरु झाले. यामध्ये नागरिक व वाहने अडकल्याची माहिती आहे. मात्र किती नागरिक अडकले आहेत याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. स्थानिक अधिकाऱ्यांनी १३१ नागरिक व २८ वाहनांना घटनास्थळी पाठवले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासन अर्लट मोडवर आहे. तत्काळ मदतकार्य सुरु केले आहे. समुद्रसपाटीपासून 3,040 मीटर (अंदाजे 10,000 फूट) उंचीवर न्यिंगची आहे.

- Advertisement -

तसेच जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तराखंड येथील जोशीमठ येथे भूस्खलन झाले आहे. जोशीमठ शहरातील भिंतींना व रस्त्यांना तडे गेले आहेत. सुमारे ५०० घरांना तडे गेल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरीत केले जात आहे. त्यावर उपाय म्हणून तेथील राज्य शासनाने धोकादायक घरात राहणाऱ्या नागरिकांना सहा महिन्याचे भाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति महिना ४ हजार रुपये येथील नागरिकांना दिले जाणार आहेत.

उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ५० किमी अंतरावर जोशीमठ शहर आहे. येथील घरांना व भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक येथून स्थलांतरीत होत आहेत.  राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व स्थानिक आपत्ती निवारण पथक परिस्थितीचा आढावा घेत आहे. येथील विविध प्रशासकीय कामेही तत्काळ थांबवण्यात आली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत प्रशासकीय कामांना स्थगिती राहणार आहे. नागरिकांनी घाबरु नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. जोशीमठचा मुद्दा सर्वाेच्च न्यायालयात पोहोचला होता. मात्र यावर तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जोशीमठ येथील घटनेचा आढाव घेतला आहे.

- Advertisement -

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -