घरदेश-विदेशPetrol Diesel Price : पेट्रोल- डिझेलच्या किमतीत होणार मोठी वाढ; गाडीची टाकी...

Petrol Diesel Price : पेट्रोल- डिझेलच्या किमतीत होणार मोठी वाढ; गाडीची टाकी आजच करा फुल्ल

Subscribe

तब्बल 120 दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पेट्रोल- डिझेलच्या किंमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाने 14 वर्षांची विक्रमी पातळी गाठली आहे. तर दुसरीकडे 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आज शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांचा कल पाहता सरकारी तेल कंपन्या आता केव्हाही पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ करू शकतात. त्यामुळे नागरिकांना आपल्या गाडीची टाकी आजच फुल्ल करून ठेवणे फायद्याचे ठरणार आहे.

नोव्हेंबरनंतर पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ नाही

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलची किंमत 100 रुपयांच्यावर गेली होती, यानंतर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून जनतेला महागाईपासून मोठा दिलासा दिला, यानंतर पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही, केंद्र सरकारने नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्कात कपात केली, तेव्हा कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल सुमारे 82 डॉलर होता. जागतिक बाजरपेठेत कच्च्या तेलाने 2008 नंतरची सर्वोच्च पातळी गाठली आहे.

- Advertisement -

पेट्रोल- डिझेल इतक्या रुपयांनी महागणार

ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने दिलेल्या अहवालात म्हटले की, पात राज्यांतील विधानसभा निवडणुका संपताच डिझेल-पेट्रोलच्या किमती पुन्हा वाढू शकतात. जेपी मॉर्गन म्हणाले की, सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलवर लिटरमागे 5 ते 7 रुपयांचे नुकसान होत आहे. जेव्हा हा अहवाल आला तेव्हा कच्चे तेल प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली होते. ते आता त्या पातळीपासून 30 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. अशात येत्या काही दिवसांत डिझेल – पेट्रोलवरचे दर वाढणार आहे. आजपासून किंवा उद्यापासून सरकारी कंपन्या केव्हाही पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढ करू शकतात.

विरोधकांकडून सरकारची कोंडी

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2 दिवसांपूर्वी सरकारवर निशाणा साधला होता. पेट्रोलची टाकी ताबडतोब भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार आहे. अस ट्विट राहुल गांधी यांनी केलं होत.

- Advertisement -

निवडणुका संपताच इंधनाच्या किमतीत  मोठ होण्याचा ट्रेन्ड 

सध्याच्या धोरणानुसार, सरकारी तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी डिझेल-पेट्रोलच्या किमतींचा आढावा घेतात. जागतिक बाजारातील क्रूडच्या ट्रेंडनुसार, देशांतर्गत बाजारात पेट्रोल, डिझेलच्या किरकोळ किमती वाढल्या किंवा कमी केल्या जातात. अशाप्रकारे आता पेट्रोल- डिझेलच्या किमती 50 टक्क्यांहून अधिकने वाढू शकतात. उत्तरप्रदेश पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे जवळपास 4 महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या नाही असा आरोप विरोधक करत आहेत.

2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका संपताच इंधनाच्या किमतीत होते मोठी वाढ केल्याचे दिसून आले. यात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 19 मे रोजी मततदान झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पेट्रोलच्या दरात 10 पैशांनी तर डिझेलच्या दरात 16 पैशांची वाढ झाली. कच्च्या तेलाच्या किमती अगोदर वाढल्या असल्या तरी तेल कंपन्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत वाढ करत नाहीत. मात्र आता निवडणुक संपताच कंपन्यांनी झपाट्याने किमती वाढवण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे 2017 मध्येही हा ट्रेंड दोनदा दिसून आला.


Russia Ukraine War: युक्रेनचे राष्ट्रपती Zelenskyy यांच्यानंतर PM Modi आता Putin यांच्यासोबत बातचीत करणार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -