घरदेश-विदेशTomatto : टोमॅटोची किंमत बघून बर्गर घाबरला...; McDonald's ने घेतला 'हा' निर्णय

Tomatto : टोमॅटोची किंमत बघून बर्गर घाबरला…; McDonald’s ने घेतला ‘हा’ निर्णय

Subscribe

 

नवी दिल्लीः टोमॅटोच्या किमतीने शंभरी पार केली आहे. वाढत्या किमती लक्षात घेऊन McDonald’s ने बर्गर आणि पदार्थांमधून टोमॅटो काढण्याच निर्णय घेतला आहे. त्यामुळे खवय्यांना काही दिवस टोमॅटो नसलेला बर्गर खावा लागणार आहे.

- Advertisement -

McDonald’s कंपनीने तसे निवेदनच काढले आहे. खरेदीच्या अडचणीमुळे काही दिवस मेन्यूमधून टोमॅटो काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. McDonald’s च्या स्टोअर्संना तसे सांगण्यात आले आहे. त्यानुसार दहा ते पंधरा टक्के स्टोअर्स त्यांच्या मेन्यूमध्ये टोमॅटो वापरणार नाही. ही काही दिवसांची समस्या आहे. पावासाळ्यात दरवर्षी खाद्य उद्योगांना महागाईचा सामना करावाच लागतो, असे कंपनीने सांगितले.

हेही वाचाःGaneshotsav 2023 : POPच्या गणेशमूर्तींना परवानगी, पण…, ‘हे’ आहे बंधन

- Advertisement -

आता मिळणारे टोमॅटो हे दर्जेदार नाहीत. कंपनीच्या गुणवत्तेशी हे टोमॅटो मेळ खात नाही. तसेच ही तात्पूरती समस्या आहे. लवकरच ही अडचण संपेल आणि McDonald’s च्या मेन्यूमध्ये काही दिवसांतच टोमॅटो दिसेल असेही कंपनीने स्पष्ट केले.

टोमॅटोच्या दरापुढे पेट्रोल स्वस्त…, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पेट्रोल-डिझेलचे दर ‘परवडले’ एवढी टोमॅटोची भाववाढ झाली आहे. टोमॅटोच्या दरापुढे पेट्रोल स्वस्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे. रोजच्या जेवणातून गायब झालेला टोमॅटो सोशल मीडियावरील मिम्स, रील्स, व्हॉटस्ऍप मेसेज यावर दिसत आहे. ताटात नसलेल्या टोमॅटोचे दुःख करायचे की, ‘स्क्रीन’वर दिसणाऱ्या ‘आभासी’ टोमॅटोकडे पाहत ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करायचा? अशा कात्रीत सामान्य माणूस सापडला आहे, असे सांगत ठाकरे गटाने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पेट्रोलच्या दरवाढीबद्दल हे कच्च्या तेलाच्या जागतिक दरवाढीकडे बोट दाखवितात. मग, जेव्हा हे जागतिक दर घटतात तेव्हा पेट्रोल-डिझेल त्या प्रमाणात स्वस्त का होत नाहीत? या प्रश्नावर नेहमी हात वर करतात. तीच गोष्ट जीवनावश्यक वस्तू तसेच डाळी, खाद्यतेल आणि भाजीपाला-फळफळावळ यांच्या दरवाढीची. या दरवाढीसाठी ते कधी कमी उत्पादनाकडे बोट दाखवितात, तर कधी नैसर्गिक परिस्थितीच्या नावाने बोटे मोडतात. मग तुमची जबाबदारी आणि काम काय? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -