JNU Attacke: आझादीच्या घोषणाबाजीवर आजोबांचा डान्स; पाहा व्हिडिओ

मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या येथील जेएनयू हल्ल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. यादरम्यानचा एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

uncle dance on azadi chants during mumbai protest over jnu attack video viral

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे. जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अनेक विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलन करत आहे असं नाही तर सामान्य जनता देखील यामध्ये सहभागी होत आहे. जेएनयू मध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाच्या इथे  बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी आणि सामान्य जनतेने आंदोलन केली. नुकताच या आंदोलनामधला एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती ‘आझादी’च्या घोषणेवर नाचताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मुंबईतील आंदोलनातील या वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ पटकथा लेखक रामकुमार सिंग यांनी ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओवर बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करताना त्यांनी जेएनयू हल्ल्याबाबत बोलले आहेत. ते म्हणाले, ‘हा व्हिडिओ पाहा. या आंदोलनातील सर्वात सुंदर असं हे दृश्य आहे. या देशाच्या महान परंपरेचा अभिमान बाळगण्याचा आणि गुंडांपासून मुक्त होण्याचा निर्धार करण्याचा हा दिवस आहे.’ पटकथा लेखन राजकुमार सिंग यांनी शेअर केलेला हा व्हिडिओ चित्रपटाचे दिग्दर्शक जैगम इमाम यांनीही ट्विटवर शेअर केला आहे.

रविवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठात तोंड झाकून काही तरुणांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला. ज्यामध्ये सुमारे ३४ लोक जखमी झाले. या घटनेच्या वेळेस कॅम्पसमध्ये अंधार होता. त्यामुळे कोणाचेही चेहरे ओळखणे हे फार अवघड होते. यासर्व घटनेच्या व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे सध्या या हल्लाविरोधात देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन केली जात आहे.


हेही वाचा – कासिम सुलेमानीच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; ३५ जणांचा मृत्यू, ४८ जण जखमी