घरताज्या घडामोडीDirty Mask: अस्वच्छ मास्क घालणं टाळा, नाही तर होऊ शकतात गंभीर आजार!

Dirty Mask: अस्वच्छ मास्क घालणं टाळा, नाही तर होऊ शकतात गंभीर आजार!

Subscribe

देशात कोरोना आणि ओमिक्रॉनची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत मास्क घालणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र सतत तोचतोच अस्वच्छ मास्क घालणे हे इतर आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे अस्वच्छ मास्क घालणे टाळा, नाही तर गंभीर आजार होऊ शकतात.

कोरोना महामारीचा काळ सुरू झाल्यामुळे मास्क हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे सध्या मास्क व्यवस्थितीत आणि स्वच्छ घालणे गरजेचे आहे. पण मास्क घालण्याची योग्य पद्धत काय? मास्क किती वेळा घालायचा? याबाबत अजूनही लोकांमध्ये संभ्रम आहे. कोरोनापासून रोखण्यासाठी जरी आपण मास्क घालत असलो तरी या अस्वच्छ मास्कमुळे गंभीर आजाराला सामोर देखील जावे लागू शकते. त्यामुळे अस्वच्छ मास्कमुळे काय होते?, कोणता मास्क किती काळ घालावा? आणि मास्क कसा साफ करावा? याबाबत जाणून घ्या…

अस्वच्छ मास्कमुळे काय होते?

अस्वच्छ मास्कमुळे घसा खवखवणे, पोटासंबंधीत समस्या आणि श्वसनाचे आजार होऊ शकतात. तसेच मास्क स्वच्छ नसल्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते. यामुळे मास्क घालणाऱ्याला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

- Advertisement -

कोणता मास्क किती काळ घालावा?

कपड्याचा मास्क हा जास्तीत जास्त तीन महिने वापरू शकता. त्यानंतर मास्क बदलणे गरजेचे आहे. तसेच डिस्पोजेबल N95 मास्क दर दोन महिन्यांनी बदलणे गरजेचे आहे. जर सर्जिकल थ्री लेअर मास्क तुम्ही वापरत असाल तर तो मास्क तीन ते चार तासांनी बदला.

मास्क साफ कसा करावा?

फक्त पाण्यामध्ये मास्क धुणे योग्य नाही. स्वच्छ मास्क धुण्यासाठी कोमट पाण्यात तो १० मिनिटे बुडवा. मग साबणाने तो मास्क स्वच्छ धुवा. त्यानंतर सुकेपर्यंत सूर्यप्रकाशात मास्क ठेवा. मास्क सुकल्यानंतर घरातील स्वच्छ जागेवर ठेवा. अशा प्रकारे मास्क स्वच्छ करून त्याचा वापर करावा. अस्वच्छ मास्क घालून गंभीर आजाराला आमंत्रण देणे टाळा.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron : आयसोलेशन बेड्स, अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या वाढवा; केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्यांना पत्र पाठवत केल्या ‘या’ सूचना


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -