घरक्रीडाआंदोलक कुस्तीपटूंना UWW चा पाठिंबा, तर भारतीय कुस्ती महासंघावर बंदीचा इशारा

आंदोलक कुस्तीपटूंना UWW चा पाठिंबा, तर भारतीय कुस्ती महासंघावर बंदीचा इशारा

Subscribe

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संसदेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले. त्याचवेळी दिल्लीमध्ये धरणे आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटू मुली आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पैलवानांनी बॅरिकेड्स तोडून नवीन संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तसेच, कुस्तीमध्ये भारताला मेडल पटकावून देणाऱ्या कुस्ती विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कुस्तीपटुंनी कमावलेलं मेडल गंगेमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संसदेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन केले. त्याचवेळी दिल्लीमध्ये धरणे आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटू मुली आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पैलवानांनी बॅरिकेड्स तोडून नवीन संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तसेच, कुस्तीमध्ये भारताला मेडल पटकावून देणाऱ्या कुस्ती विनेश फोगाट, संगीता फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर कुस्तीपटुंनी कमावलेलं मेडल गंगेमध्ये विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कुस्तीपटूंचा हा वाद आता भारतापूरता राहिलेला नसून, देशाबाहेर गेला आहे. तसेच, आंदोलक कुस्तीपटूंना युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने पाठिंबा जाहीर केला असून, भारतीय कुस्ती महासंघाला मोठा इशाराही दिला आहे. (united world wrestling threatens for ban condemns detention of wrestlers)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कुस्तीपटूंना आंदोलनादरम्यान ताब्यात घेतले. पैलवान विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी फरफटत ताब्यात घेतले. या घटनेनंतर सर्वच स्तरातून दिल्ली पोलिसांचा निषेध केला जात आहे. अशातच या घटनेची दखल आता थेट सर्वोच्च कुस्ती महासंघाने घेतली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने जंतरमंतर येथे पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्याचा निषेध केला. विहित मुदतीत निवडणुका न घेतल्यास भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला. त्यामुळे भारतासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कुस्तीपटूंनी पदके विसर्जीत करण्याचा निर्णय घेतला मागे, शेतकरी नेत्यांनी काढली समजूत

“अनेक महिन्यांपासून, आम्ही भारतातील परिस्थितीबद्दल चिंतित आहोत, जिथे कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध छळ आणि शोषणाचा आरोप करत निदर्शने करत आहेत. आम्ही पाहिले आहे की WFI अध्यक्षांना सुरुवातीला बाजूला केले गेले होते आणि आता ते कुस्तीचे कामकाज पाहत नाहीत”, असे UWW ने सांगितले.

- Advertisement -

“गेल्या काही दिवसातील घडामोडी अधिक चिंताजनक आहेत. कारण आंदोलनामुळे कुस्तीपटूंना पोलिसांनी तात्पुरते ताब्यात घेतले होते. त्यांच्या आंदोलनाचे ठिकाणही रिकामे करण्यात आले. पैलवानांच्या अटकेचा आम्ही निषेध करतो. याशिवाय तपासाचे निकाल अद्याप न आल्याने त्यांनी निराशाही व्यक्त केली. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची विनंती करतो”, असे UWW ने सांगितले.

हेही वाचा – Wrestlers Throw Medals In Ganges : आंदोलक कुस्तीपटू आक्रमक; गंगेत विसर्जित करणार मेडल

“आम्ही कुस्तीपटूंशी त्यांची स्थिती आणि सुरक्षिततेबाबत बोलू आणि त्यांच्या तक्रारींचे निष्पक्ष आणि न्याय्य निराकरण करण्याच्या बाजूने आहोत. शेवटी आम्हाला पुढील सर्वसाधारण सभेबाबत आयओए आणि तदर्थ समितीकडून माहिती हवी आहे. निवडणुकीसाठी दिलेली 45 दिवसांची मुदत पाळली पाहिजे. त्यातच निवडणुका न घेतल्यास डब्ल्यूएफआय निलंबित केले जाऊ शकते, जेणेकरून खेळाडू तटस्थ ध्वजाखाली खेळतील”, यूडब्ल्यूडब्ल्यू म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -