घरताज्या घडामोडीUP Assembly Election: 'माझा कुत्रा बनवला'! तिकिट न दिल्याने इमरान मसूद भडकले,...

UP Assembly Election: ‘माझा कुत्रा बनवला’! तिकिट न दिल्याने इमरान मसूद भडकले, काँग्रेस सोडून केला होता सपा प्रवेश

Subscribe

पश्चिम उत्तर प्रदेशात एक मजूबत नेते म्हणून मानले जाणारे इमरान मसूद विधानसभा निवडणूक जवळ येताच काँग्रेसला सोडून समाजवादी पार्टीमध्ये सामिल झाले. परंतु त्यांना अखिलेश यादव यांनी तिकिट देणे नाकारले.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uattar Pradesh Assembly Election 2022) उमेदवारीचे तिकिट मिळण्यासाठी हातचा हात (काँग्रेस) सोडून सायकलवरून प्रवास (समाजवादी पार्टी) करण्यासाठी निघालेले इमरान मसूद (Imran Masood) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये इमरान मसूद मुस्लिमांना सुधारण्याचा सल्ला देत ‘माझा कुत्रा बनवला’ असे म्हणत आहे.

पश्चिम उत्तर प्रदेशात एक मजूबत नेते म्हणून मानले जाणारे इमरान मसूद विधानसभा निवडणूक जवळ येताच काँग्रेसला सोडून समाजवादी पार्टीमध्ये सामिल झाले. परंतु त्यांना अखिलेश यादव यांनी तिकिट देणे नाकारले. इमरान मसूद यांनी सहारनपुर देहातचे आमदार मसूद अख्तर यांच्यासोबत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. तिकिट न मिळाल्यामुळे लखनऊहून सहारनपूर येथील निवासस्थानी परतल्यानंतर इमरान मसूद यांनी आपल्या समर्थकांना सल्ला दिला. आणि तिकिट न मिळाल्याची खंत व्यक्त केली.

- Advertisement -

 

सारे मुसलमान एक हो जाओ, सब पैर पकड़ेंगे – मोदीजी को मारने का ख़्वाब रखने वाले इमरान मसूद का एक और ख़्वाब !!

Posted by Rameshwar Sharma on Tuesday, January 18, 2022

 

- Advertisement -

इमरान मसूद म्हणाले खी, ‘दुसऱ्यांचे पाय पकडताय. तुम्ही मुसलमान-मुसलमान सरळ व्हा, माझे पाय का पकडत आहात. सर्व जण माझे पाय पकडत फिरत आहेत. पाय पकडायला दिले, माझा कुत्रा बनवला.’ या व्हिडिओ संदर्भात इमरान मसूद म्हणाले की, ‘मला याबाबत काही माहित नाही. माझ्या कोणत्यातरी समर्थकाने हा व्हिडिओ करून व्हायरल केला आहे. तसेच यामध्ये मी जे काही बोलत आहे, ते मी स्वतःला बोलत आहे.’

यापूर्वी तिकिट न मिळाल्यामुळे बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते अरशद राणा यांचा रडणारा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीपूर्वी बसपाचे कार्यकर्ते अरशद राणा आगामी निवडणुकासाठी पक्षाकडून तिकट देण्याचा दावा केल्याचे सांगत ढसाढसा रडताना दिसले होते. परंतु शेवटच्या क्षणी त्यांना तिकट न देण्याचा निर्णय घेतला होता.


हेही वाचा – Goa Election 2022 : उत्पल पर्रिकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं, जितेंद्र आव्हाडांकडून खुली ऑफर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -