घरAssembly Battle 2022UP Election Result 2022 : प्रियंका गांधींना यूपीत नाकारलं, काँग्रेसचे 'महिला कार्ड...

UP Election Result 2022 : प्रियंका गांधींना यूपीत नाकारलं, काँग्रेसचे ‘महिला कार्ड फेल’

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बुल्डोझर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सायकलवर भारी पडताना दिसत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी स्वतः मैदानात उतरल्या होत्या. यावेळी निवडणुकीचा महिलांच्या मुद्द्यावर काँग्रेसनं निवडणूक लढवली होती. तसेच ५० टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आली होती. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. परंतु प्रियंका गांधी यांचे महिला कार्ड फेल होताना दिसत आहे. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला खातं खोलणं मुश्कील झाले होते. शेवटी काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर दिसत आहे. यूपीमध्ये भाजप २५० जागा पार करत आहे. तर समाजवादी पार्टी १४४ जागांवर आघाडीवर आहे. मायावतींच्या बसपालाही जनतेनं नाकारलं असल्याचे दिसत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून येतील अशी चर्चा होती. भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसनं महिलांना उमेदवारी दिली होती. ज्या महिला पीडित आहेत. ज्यांनी आपल्या प्रयत्नांनी यश संपादन केलं अशा महिलांना उमेदवारी दिली होती. परंतु हे महिला कार्ड जनतेनं पार नाकारलं आहे.

- Advertisement -

मतमोजणीमध्ये सुरुवातीला काँग्रेस पिछाडीवर होती. यानंतर ३ जागांवर आघाडीवर होती आणि ही परिस्थिती दुपारी १२ वाजेपर्यंत सारखीच राहिली. उलट भाजपने मुसंडी मारत २५० जागांवर आघाडी घेतली तर सपा ११४ जागांवर आघाडीवर होती.

बुल्डोझर सायकलवर भारी

उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बुल्डोझर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सायकलवर भारी पडताना दिसत आहे. योगी आदित्यनाथ यांचा भाजप आघाडीवर आहे. भाजपने २५० जागांवर आघाडी घेतली आहे. तर समाजवादी पार्टी ११४ जागांवर आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Assembly Election 2022: यूपी अन् पंजाबमध्ये इतिहास बदलणार, उत्तराखंडमध्ये भाजपची विजयाकडे वाटचाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -