घरताज्या घडामोडीUP MLC Election 2022 : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस,...

UP MLC Election 2022 : विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस, भाजपकडून ६ जणांची नावे जाहीर

Subscribe

उत्तर प्रदेशमध्ये ३६ जागांवर ९ एप्रिल २०२२ रोजी निवडणूक होणार आहे. भाजपकडून सोमवारी उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी ६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जाहीर करण्यात आलेल्या यादीत सुभाष यदुवंश, अविनाश सिंह चौहान, विनीत सिंह, शैलेंद्र प्रताप सिंह, सुदामा सिंह पटेल आणि ब्रिजेश सिंह प्रिशू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपने ३० एमएलसी उमेदवारांची नावे जाहीर केली होती. उत्तर प्रदेशात विधान परिषदेच्या एकूण १०० जागा आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या नामांकनाची मुदत वाढवण्यात आली आहे. २१ मार्चपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती. १५ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ९ एप्रिलला निवडणूक होणार असून १२ एप्रिलला निकाल लागणार आहे.

- Advertisement -

उत्तर प्रदेशातील विधान परिषदेचा मसूदा

विधान परिषदमध्ये ६ वर्षांसाठी सदस्यांची निवड करण्यात येते. उत्तर प्रदेशात विधान परिषदेच्या एकूण १०० जागा आहेत. सर्व सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने निवडून येतात. १०० पैकी ३६ जागा स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी निवडून देतात. तर १०० जागांपैकी १/१२ म्हणजेच ८-८ जागा शिक्षक आणि पदवीधर क्षेत्रासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. तर राज्यपाल १० वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक प्रतिनिधींना निवडून देतात. तर उर्वरित ३८ जागांवर विधानसभा आमदार मतदान करुन विधान परिषदेचे सदस्य निवडून देतात

समाजवादी पार्टीकडे बहुमत

उत्तर प्रदेशच्या विधान परिषधेमध्ये समाजवादी पक्षाचे बहुमत आहेत. एकूण १०० सदस्यांपैकी सपाचे ५१ सदस्य आहेत. वरच्या सभागृहात सपा ४८ जागांवर बहुमतात आहे. तर भाजपचे ३६ सदस्य आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सपाच्या ८ सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपचा एक विधान परिषद आमदार भाजपमध्ये गेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Chhattisgarh Naxal : छत्तीसगडच्या सुकमामध्ये नक्षलवाद्यांचा गोळीबार; ३ सीआरपीएफ जवान जखमी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -