घरदेश-विदेशUPSC Result 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात...

UPSC Result 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला

Subscribe

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेचा 2023 चा अंतिम निकाल आज मंगळवारी (ता. 16 एप्रिल) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने प्रथम क्रमांकावर बाजी मारली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC परीक्षेचा 2023 चा अंतिम निकाल आज मंगळवारी (ता. 16 एप्रिल) जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने प्रथम क्रमांकावर बाजी मारली असून अनिमेश प्रधान हा देशात दुसरा आला आहे. मागील दोन परीक्षांमध्ये मुलींनी बाजी मारली होती. मात्र, यावेळेस पहिल्या दोनमध्ये मुलांचा क्रमांक आला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर डोनुरू अनन्या रेड्डी हिचे नाव आहे. 2023 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे. (UPSC Result 2023 Central Public Service Commission Result Declared)

केंद्रीय लोकसेवेअंतर्गत आयएएस अर्थात भारतीय प्रशासकीय सेवा, आयपीएस अर्थात भारतीय पोलीस सेवा, आयएफएस अर्थात भारतीय परराष्ट्र सेवा व गट अ आणि गट ब मधील इतर केंद्रीय सेवांसाठी पदभरती करण्यात येणार आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनिकेत हिरडे, प्रियांका सुरेश मोहीते, अर्चित डोंगरे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Heat wave : शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंचे राज्य सरकारला आवाहन

केंद्रीय लोकसेवा आयोग 2023 च्या परीक्षेत एकूण 1016 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 347 उमेदवार खुल्या प्रवर्गाचे, 116 उमेदवार आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे, 303 उमेदवार ओबीसी प्रवर्गाचे, 165 उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गाचे तर 86 उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आहेत. तर, 355 उमेदवारांना प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्रीय लोक सेवा आयोगाकडून 11436 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. यातील 1016 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली आहे. या परीक्षेमध्ये लखनऊच्या आदित्य श्रीवास्तव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर अनिमेष प्रधान याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर अनन्या रेड्डी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तसेच चौथ्या क्रमांकांचा मानकरी पीके सिद्धार्थ रामकुमार ठरलेला आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर हा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

असा पाहा निकाल…

upsc.gov.in या संकेतस्थळावर UPSC CSE Results या लिंकवर क्लिक करा. आपले लॉगइन डिटेल्स इथे भरा. तुमचा निकाल स्क्रीनवर दिसू लागेल. निकालपत्र डाऊनलोड करण्याचाही पर्याय इथे देण्यात आला आहे.

हेही वाचा… Ayodhya Ram Mandir : राम नवमीसाठी अयोध्या सजली, भाविकांना होणार 20 तास दर्शन


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -