घरताज्या घडामोडीअमेरिकेने भारतात प्रवास करण्याच्या नियमात दिली शिथिलता

अमेरिकेने भारतात प्रवास करण्याच्या नियमात दिली शिथिलता

Subscribe

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात अमेरिकेने प्रवास निर्बंध लादले होते. परंतु आता भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच अमेरिकेन भारतामधील प्रवास निर्बंध शिथिल केले आहेत. देशात प्रवास करणाऱ्या आपल्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल एडवाइजरीमध्ये भारत लेव्हल २ झाले आहे. म्हणजेच आता भारत तिसऱ्या लेव्हलवरून दुसऱ्या लेव्हलवर आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे दहशतवादामुळे आणि नागरी अशांततेमुळे पूर्व लडाख क्षेत्र आणि राजधानी लेह वगळता जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास न करण्याचे आवाहन अमेरिकेकडून करण्यात आले आहे. तसेच सशस्त्र संघर्षाच्या शक्येतमुळे भारत-पाकिस्तान सीमेच्या १० किलोमीटर जवळ प्रवास करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या केसेस लक्षात घेऊन अमेरिकेने भारताला लेव्हल ४ मध्ये ठेवले होते. कोणत्याही देशात प्रवास न करणाऱ्याच्या सल्ल्याला लेव्हल ४ म्हटले जाते. परंतु अमेरिकेने आता भारतामधील कोरोना केसेस कमी होत असल्यामुळे लेव्हल ४वरून हटवून लेव्हल ३वर आणि आता लेव्हर २वर आणले आहे. लेव्हल ३ म्हणजे प्रवाशी प्रवासासाठी विचार करू शकतात.

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC)ने आता भारतासाठी लेव्हल २ ट्रॅव्हल हेल्थ नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये सांगितले आहे की, कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यापूर्वी CDC चे महत्त्वाचे सल्ले आवश्य वाचा. परराष्ट्र विभागाने देखील म्हटले आहे की, जर तुम्ही FDA मान्यतापात्र लस टोचून लसीकरण पूर्ण केले असेल तर तुम्हच्या शरीरात कोरोनाचे गंभीर लक्षणे विकसित होण्याचा धोका कमी असतो.

- Advertisement -

हेही वाचा – चीन, पाकिस्तानचा तालिबान्यांकडे मैत्रीचा हात; भारताची चिंता वाढली


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -