Vaccine: २ वर्षांवरील मुलांना ‘या’ महिन्यात मिळणार covaxin लस, AIIMSच्या डॉक्टरांची माहिती

फायझर बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीला परवानगी मिळाली तर या लसी देखील लहान मुलांसाठी उपलब्ध होऊ शकतात

Vaccine: Children above 2 years of age will get covacin vaccine till September, according to AIIMS doctor randeep guleria
Vaccine: २ वर्षांवरील मुलांना 'या' महिन्यात मिळणार कोव्हॅक्सिन लस , AIIMSच्या डॉक्टरांची माहिती

देशात कोरोनाची पहिली लाट ओसरत असतानाच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाची तिसरी प्रामुख्याने लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. जून महिन्यापासूनच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात एक आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत २ वर्षांवरील लहान मुलांना कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचे दिल्लीच्या AIIMS रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS doctor randeep guleria) यांनी सांगितले आहे. २ वर्षावरील मुलांना भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन ( covaxin) लस दिली जाणार आहे. (Vaccine: Children above 2 years of age will get covacin vaccine till September, according to AIIMS doctor randeep guleria)

देशात कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसींची स्क्रिनिंग सुरु करण्यात आली आहे. सप्टेंबर पर्यत या चाचण्यांचा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील डेटा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिन लस लहान मुलांना देण्याचा मार्ग मोकळा होईल. त्याचप्रमाणे याचदरम्यान जर फायझर बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीला परवानगी मिळाली तर या लसी देखील लहान मुलांसाठी उपलब्ध होऊ शकतात,असे देखील डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे.

देशात आता १७ वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरु आहे. याच दरम्यान आता कोरोना व्हायरसचा नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंट (delta plus veriant) धुमाकूळ घालत आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटमुळे पुढील काळात आळखी चिंता वाढणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या व्हेरिएंटवर लस आणि नैसर्गिक अँटिबॉडीज देखील काम करत नसल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. देशात मंगळवारी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २२ रुग्ण समोर आले आहेत.


हेही वाचा - डेल्टा व्हेरिएंटविरोधात कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सीन लस प्रभावी, केंद्रीय आरोग्य विभागाची माहिती