घरदेश-विदेशVIDEO : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ अतिरेक्यांचा खात्मा २ पोलीस शहीद

VIDEO : श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ अतिरेक्यांचा खात्मा २ पोलीस शहीद

Subscribe

दहशतवादी हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनेचा खात्मा करण्याची मोहिम हाती घेतली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांसोबत चकमक झाली. जम्मूत दोन ठीकाणी ही चकमक झाली आहे. या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. पहिली चकमक शोपियांमध्ये झाली असून यामध्येच तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तर बडगाम येथे झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात एका एसपीओ शहीद झाला आहे. दरम्यान चकमकीत ठार करण्यात आलेले अतिरेकी हे लष्कर-ए-तोयबाचे असल्याचे तपासामध्ये कळाले आहे. या चकमकीनंतर जम्मूमध्ये तपास अधिक वेगाने सुरु आहे. तर बारामुल्ला येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यात १ पोलीस शहीद झाला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार,जम्मूतील शोपियांमध्ये रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दहशतवाद्यांसोबत सकाळपर्यंत चकमक सुरु होती. यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये सुरक्षा दलाला यश मिळाले आहे. तर बडगाममधील हल्ल्यात पोलीस दलातील एसपीओ शहीद झाला आहे. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारुगोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

बारामुल्लामध्ये भरदिवसा अतिरेकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एके-४७ रायफलने बेछूट गोळीबार करण्यात आला आहे. यामध्ये १ पोलीस शहीद झाला आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. दरम्यान हा दहशतवादी हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या हल्ल्याच्या तपासात एक संशयिताच्या मुसक्या आवळण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. तसेच संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -