घरदेश-विदेश...आणि मुलीचा मृतदेह १० किलोमीटर खांद्यावरून नेणाऱ्या व्यथित पित्याचा व्हिडीओ व्हायरल

…आणि मुलीचा मृतदेह १० किलोमीटर खांद्यावरून नेणाऱ्या व्यथित पित्याचा व्हिडीओ व्हायरल

Subscribe

एक पिता आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन १० किलोमीटर चालत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यातील ही घटना असून यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

एक पिता आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन १० किलोमीटर चालत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यातील ही घटना असून यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसंच, या व्हायरल व्हिडीओची छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंह देव यांनी दखल घेतली. तसंच, या व्हिडिओच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सुरेखा असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. ती आमदळा गावची रहिवासी आहे. सकाळी तिचे वडील ईश्वर दास यांनी त्यांच्या आजारी मुलीला लखनपूर सीएचसीमध्ये आणले. शुक्रवारी सकाळी लखनपूर गावात असलेल्या सामुदायिक आरोग्य केंद्रात या मुलीचा मृत्यू झाला. त्यावेळी त्याठिकाणी रुग्णवाहिका तेथे पोहोचण्यापूर्वीच मुलीच्या वडिलांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला.

- Advertisement -


मिळालेल्या माहितनुसार, या मुलीची ऑक्सिजन पातळी ६० च्या आसपास होती. तसंच, कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला गेल्या काही दिवसांपासून ताप होता. यावेळी ‘मुलीवर उपचार सुरू करण्यात आले होते, परंतु तिची प्रकृती आधीच खूप वाईट होती आणि हळूहळू ती आणखीनच बिघडत गेली. त्याचवेळी उपचारादरम्यान सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की लवकरच तिची घोडागाडी येईल’, असं आरोग्य केंद्रात उपस्थित असलेले ग्रामीण वैद्यकीय सहाय्यक (आरएमए) डॉ विनोद भार्गव यांनी सांगितले.

छत्तीसगडच्या सुरगुजा जिल्ह्यातील एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. वास्तविक या व्हिडिओमध्ये एक पिता आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडीओची छत्तीसगडचे आरोग्य मंत्री टीएस सिंह देव यांनी दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एकीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लोक संतप्त झाले आहेत. त्याचबरोबर या घटनेवर अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sunday Streets : मुंबई पोलिसांची ‘संडेस्ट्रीट’ संकल्पना, मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -