घरदेश-विदेशआम्हाला टार्गेट केलं जातंय; सोनिया गांधींचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

आम्हाला टार्गेट केलं जातंय; सोनिया गांधींचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

Subscribe

फेब्रुवारी 2020 दिल्लीत झालेल्या दंगली संबंधित विविध याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेलया दंगलीदरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी आम्हाला विनाकारण टार्गेट करण्यात येत आहे असं म्हणाल्या. प्रतिज्ञापत्रात याचिकेला विरोध करताना मी असे कोणतेही वक्तव्य केले नाही असंही म्हटलं आहे. फेब्रुवारी 2020 दिल्लीत झालेल्या दंगली संबंधित विविध याचिकांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

हे ही वाचा – गणेशोत्सवानिमित्त मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ ऑफर; प्रवाशांसाठी खास प्लॅन तयार

- Advertisement -

दरम्यान, या प्रकरणी दोन याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यात वादग्रस्त विधान करणाऱ्या राजकारण्यांवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे. शेख मुजतबा फारूक यांनी दाखल केलेल्या याचिकेत द्वेषपूर्ण भाषणासाठी भाजप नेते अनुराग ठाकूर, कपिल मिश्रा, परवेश वर्मा आणि अभय वर्मा यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी सुद्धा केली आहे.

हे ही वाचा – कोळसा घोटाळ्याप्रकरणी ममता बॅनर्जींच्या पुतण्याला ईडीचा समन्स, 2 सप्टेंबरला होणार चौकशी

- Advertisement -

दरम्यान, दुसरा अर्ज ‘लॉयर्स व्हॉईस’ ने दाखल केला होता, ज्यात काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान, एआयएमआयएम नेते ओवेसी, एआयएमआयएमचे नेते ओवेसी यांच्या द्वेषयुक्त भाषणाचा आरोप आहे. माजी आमदार वारिस पठाण, मेहमूद प्राचा, हर्ष मंदर, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, अभिनेत्री स्वरा भास्कर, उमर खालिद यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा – शिवसेनेसारखी बंडखोरी काँग्रेसमध्येही होणार? गुलाम नबी आझाद यांचा मास्टरप्लान

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -