Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी West Bengal Assembly Election 2021 Result Updates : कंगनाने भाजपच्या पश्चिम बंगालमधील...

West Bengal Assembly Election 2021 Result Updates : कंगनाने भाजपच्या पश्चिम बंगालमधील पराभवाची तुलना केली काश्मीरशी

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालच्या निवडणूकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पार्टीला बहुमत मिळून विजय झाला. एकूण २१० जागा जिंकून उमेदवार निवडून आले. तर दुसरीकडे भाजपचा ७६ जागांनी विजय झाला. ममत बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पार्टीचा विजय झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत नाराज झाल्याचे दिसून आले आहे. कंगनाने निवडणूकींच्या निकालानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमूधन ममत बॅनर्जी यांचा पक्ष जिंकल्याचा राग तिने व्यक्त केला आहे. तिन केलेल्या ट्विटमध्ये रोहिंग्या आणि बांग्लादेशीयांमुळे ममत बॅनर्जी यांच्या ही निवडूका लढण्यात यशस्वी होऊ शकल्या असे म्हटले आहे. ‘बांग्लादेशी आणि रोहिंगे हे ममता यांची मोठी ताकद आहे. ज्या प्रकारची प्रवृत्ती समोर येत आहे त्यातून असे दिसून येत आहे की, तिथे हिंदूंची संख्या फार कमी आहे. आकड्यांनुसार बंगाली मुसलमान संपूर्ण भारतात सर्वात गरीब आणि वंचित आहेत, चांगले आहे आणखी एक काश्मीर तयार होत आहे’, असे म्हणून कंगनाने थेट काश्मीरशी तुलना केली आहे. तिच्या पोस्ट नंतर अनेक युझर्सच्या कमेंट आल्या आहेत. त्या कमेंटने कंगनाला चांगलीच उत्तरे देखिल दिली आहेत.


पुढे कंगनाने असे म्हटले आहे की, ‘२०१६ मध्ये भाजपने बंगालमध्ये ३ जागा जिंकल्या होत्या. आता NRC आणि CAA ची गरज आहे. बंगालमध्ये अंल्पसंख्यांक आता बहुसंख्यांक झाले आहेत. ज्या प्रकारे मोदी आणि अमित शहा यांनी उत्कटतेने आणि समर्पण पद्धतीने काम केले आहे त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे. पुढील काळात बंगालमध्ये होणाऱ्या ब्लड बाथसाठी डोळे बंद करणे कठीण होणार आहे. आतापर्यंत अनेक जण मेले आहेत. मात्र पराभवाच्या भितीने त्यांना सापडलेली नवीन शक्तीमुळे अधिक रक्ताची तहान लागले, तिच त्यांना सामर्थ्यवान बनवेल’, असेही कंगनाने म्हटले आहे.

- Advertisement -

कंगनाच्या या पोस्टवर अनेक युझर्सनी कमेंट केल्या आहेत. ‘भाजपच्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे हरले. प्रत्येक वस्तूमध्ये महागाई करुन ठेवली आहे. जेव्हा तुम्ही गरीब मध्यमवर्गीय लोकांना एक गॅस सिलेंडर ९०० रुपयांनी देता त्यावेळी त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षा ठेवू नका’, असे एका युझर्सने म्हणले आहे. ‘देश कोरोनाशी लढतो आहे हे नाही दिसल का? तुम्ही भाजपचे समर्थन करत आहात बघा एकदिवस ते तुम्हाला नक्कीच आमदार बनवतील’, असा टोलाही युझर्सने कंगनाला लगावला आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – नितीश कुमार सरकारने पत्रकारांसाठी घेतला मोठा निर्णय, कोरोना लसीकरणाबाबत दिला आदेश

- Advertisement -