घरअर्थजगतAxis Bank-Citi India यांच्यात 1.6 बिलियन डॉलरची डील, ग्राहकांवर होणार परिणाम?

Axis Bank-Citi India यांच्यात 1.6 बिलियन डॉलरची डील, ग्राहकांवर होणार परिणाम?

Subscribe

देशाच्या खाजगी क्षेत्रातील दिग्गज अॅक्सिस बँकेने अमेरिकेच्या Citi bank चा भारतीय ग्राहक व्यवसाय 1.6 अब्जमध्ये विकत घेतला आहे. हा व्यवहार पूर्णपणे रोखीने केले जात आहे. सिटी बँकेने 30 जानेवारी रोजी दिलेल्या माहितीनुसार, अॅक्सिस बँक आता सिटी बँकेचे क्रेडिट कार्ड, रिटेल बँकिंग, वेल्थ मॅनेजमेंट आणि कंज्यूमर लोनचा व्यवसाय ताब्यात घेणार आहे.

अ‍ॅक्सिस बँकेचे सीईओ अमिताभ चौधरी यांनी सांगितले की, हा करार 12,325 कोटी रुपयांचा असून ज्यामध्ये सिटी बँकेचा संपूर्ण व्यवसाय अॅक्सिस बँकेकडे हस्तांतरित केला जाईल. यासोबतच या कराराला मंजुरी मिळण्यासाठी 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. अॅक्सिस बँकेला सिटी बँकेचा संपूर्ण कारभार ताब्यात घेण्यासाठी 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागेल, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

सिटी बँकेच्या वतीने असे सांगण्यात आले की, या डीलमध्ये सिटी बँकेच्या नॉन बँकिंग फायनांशियल कंपनी सिटीकॉर्प फायनान्स इंडिया लिमिटेडच्या व्यवसायाचाही समावेश आहे. अॅक्सिस बँकेला यामध्ये मालमत्ता-बॅक्ड फायनान्सिंग बिजनेस देखील मिळेल. यामध्ये कमर्शियल व्हीकल आणि कंस्ट्रक्शन इक्विपमेंट लोन तसेच पर्सनल लोनचा समावेश आहे.

‘या’ डीलनंतर आता सिटीबँकेच्या कर्मचाऱ्यांचे काय?

आशियातील इतर देशांपैकी सिटीबँक ऑफ अमेरिकेचा सर्वात मोठा व्यवसाय भारतात होता. सिटी बँकेच्या भारतात 35 ब्रांच आहेत ज्यात एकूण 3600 कर्मचारी काम करतात. 2021 मध्ये सिटी बँकेने भारतासह 13 देशांमध्ये आपला कंज्यूमर बिजनेस गुंडाळण्याची घोषणा केली होती. ज्यामागे कंपनीने संपत्ती व्यवस्थापन व्यवसायावर आपले लक्ष केंद्रित करण्याचे कारण सांगितले होते.

- Advertisement -

भारतातील व्यवसाय केव्हा झाला सुरू?

सिटी बँकेने 1902 मध्ये कोलकाता येथे भारतातील पहिले ऑपरेशन ऑफिस उघडले आणि 1985 मध्ये कंज्यूमर बिझनेस सुरू केला. सध्या भारतात सिटी बँकेच्या एकूण ग्राहकांची संख्या सुमारे 29 लाख आहे.

ग्राहकांवर होणार परिणाम?

सिटी बँकेचे सीईओ आशु खुल्लर म्हणाले की, बँकेचे प्राधान्य हे आहे की, अॅक्सिस बँकेकडून सकारात्मक परिणाम दिसले आहेत जेणेकरून त्यांच्या कर्मचार्‍यांना कोणतीही अडचण येऊ नये. यासोबतच त्यांनी सांगितले की, डील फायनल झाल्यानंतर सर्व ग्राहकांना अॅक्सिस बँकेची सेवा मिळेल.


Tom Parker Death : ‘द वाँटेड’ फेम ब्रिटिश सिंगर टॉम पार्करचे निधन, मेंदूच्या कॅन्सरशी देत होता झुंज


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -