घरCORONA UPDATEकोरोनाच्या आणखी एका व्हेरियंटने वाढवली जगाची डोकेदुखी, लस ठरतेय निष्प्रभ-WHO

कोरोनाच्या आणखी एका व्हेरियंटने वाढवली जगाची डोकेदुखी, लस ठरतेय निष्प्रभ-WHO

Subscribe

कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जगभरात सतत प्रयत्न सुरु आहेत. यासाठी लसीकरण मोहिमेची वेग वाढवला जात आहे. अशातच कोरोनाच्या आणखी एका नव्या व्हेरियंटने जगाची डोकेदुखी आणखी वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील या नव्या व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. Mu असे या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे नाव आहे. या व्हेरियंटवर आता शास्त्रज्ञ लक्ष ठेवून असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. Mu या नव्या व्हेरियंटला B.1.621 असे संबोधले जात असून त्याची ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ या रुपात वर्गीकरण करण्यात आले आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोनाविरोधी लसीचा सुद्धा Mu व्हेरियंटवर निष्प्रभ ठरतेय असं तज्ञांकडून सांगितले जात आहे. कोरोना व्हेरियंटचे हे म्युटेशन आहे.

या व्हेरियंटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संशोधन सुरु असल्याचे WHO ने आपल्या बुलेटीनमध्ये सांगितले आहे. तसेच Mu व्हेरिएंट (mu variant) हा म्युटेशनचा एक कॉन्स्टेलेशन आहे. जो कोरोनविरोधी लसीपासूनही स्वत:चा बचाव करु शकतो.

- Advertisement -

कोरोनाचा हा नवा म्युटेशन आता जागतिक स्तरावर चिंतेचा विषय ठरतोय. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक पातळीवर कोरोना संसर्ग वाढू शकतो अशी भीती व्यक्त केली जातेय. तर कोरोनाची लस न घेतलेल्या आणि सुरक्षेसंबंधीत उपायायोजनांचे पालन न करणाऱ्या लोकांमुळे हा म्यूटेशन अधिक प्रमाणात पसरु शकतो.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाला कारणीभूत ठरलेल्या SARS-CoV-2 सह सर्वच व्हायरसचे म्युटेशन होत आहे. अशातच WHO च्या अभ्यासात सध्या कोरोनाचे चार व्हेरिएंट समोर आले आहेत. या व्हेरियंटमध्ये अल्फा व्हेरियंटचा सुद्धा समावेश आहे. तर डेल्टा व्हेरियंट १७० देशांमध्ये आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटना सध्या संशोधन करत असलेल्या व्हेरियंटमध्ये आता Mu या पाचव्या व्हेरियंटची भर पडली आहे. कोलंबिया आणि दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये हा व्हेरियंट आढळून आला आहे.


Afghanistan Crisis: तालिबानला धक्का! पंजशीरमध्ये हल्ला करणं आलं अंगलट, ३५० दहशतवादी ठार


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -