घरदेश-विदेशWorldparnetDay2021: जाणून घ्या कधी आणि का साजरा केला जातो पालक दिन

WorldparnetDay2021: जाणून घ्या कधी आणि का साजरा केला जातो पालक दिन

Subscribe

2012 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पालक दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. एखादे मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा पालकांच्या जबाबदारीत वाढ होते.

 

भारतीय संकृती मध्ये एकत्र कुटुंब पद्धतीला विशेष महत्व आहे. चार भिंती बांधल्यावर घर तयार होत असलं तरी  घराला घरपण हे कुटुंबातील माणसामुळे येतं. आणि हे घरपण आई वडीलांमुळे टिकून आहे हि बाब विसरून चालणार नाही. आई वडलांच्या कष्टाने,एका-एका पैशाने घर उभे राहते तसेच हा संसार फुलवताना त्यांनी रक्ताचं पाणी होते. त्यांच्या कष्टाच्या ऋणाणूबंधातून आपण कधीच मुक्त होऊ  शकत नाही. आज जागतिक पालक दिन आहे. आणि या निमित्ताने आज आपण या दिवसाचे महत्व आणि इतिहास जाणून घेऊया.

- Advertisement -

जागतिक पालक दिन केव्हा असतो ?

2012 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक पालक दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. एखादे मूल जेव्हा जन्माला येते तेव्हा पालकांच्या जबाबदारीत वाढ होते. मुलाचे समाजामध्ये नाव व्हावं त्याने उत्तम शिक्षण घ्यावं,लोकांच्या हितासाठी त्याने पुढाकार घ्यवा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते आणि यासाठी ते अहोरात्र झटत असतात. पालकांचे हे कष्ट  पाहता संयुक्त राष्ट्र संघटनेने पालक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -
कसा करणार साजरा पालक दिन –

पालक आपल्या मुलांसाठी अनेक गोष्टी करतात. मुलांच्या आनंदासाठी प्रत्येक पालकांची तगमग सुरू असते. तर या विशेष दिवशी त्यांच्या आनंदासाठी पत्येक व्यक्तीने काहीना काही केले पाहिजे. जेणे करून त्यांना हा एक दिवस तरी विशेष आठवणीत रहेन. पालकांना शुभेच्छा द्याव्यात,जेवणासाठी बाहेर घेऊन जाने,गिफ्ट देणे,यासारख्या त्यांना आनंद देणार्‍य गोष्टी आपण करू शकतो


हे हि वाचा – world no tobacco day: धूम्रपान करणाऱ्यांनो सावधान! कोरोनामुळे ५० टक्के मृत्यूचा धोका जास्त; WHOचा इशारा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -