घरताज्या घडामोडीनोकरीच्या मोबदल्यात सेक्स, या देशातील महिला ए़ड्सच्या विळख्यात

नोकरीच्या मोबदल्यात सेक्स, या देशातील महिला ए़ड्सच्या विळख्यात

Subscribe

नोकरीच्या मोबदल्यात गरजूंकडून सरासपणे सेक्सची मागणी केली जात आहे. यामुळे आजच्या घडीला झिम्बाब्वेमध्ये सर्वाधिक महिलांना एड्सची लागण झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना महामारीनंतर जगातील अनेक देशांमध्ये महागाईचा भडका उडाला असून बेरोजगारीमुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. झिम्बाब्वे या दक्षिण अफ्रीकी देशामध्ये जवळ जवळ ९० ट्कके जनता बेरोजगार आहे. यामुळे दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी कुठलेही काम करण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. त्यातही येथील महिलांची अवस्था सर्वाधिक भयंकर असून नोकरीच्या मोबदल्यात त्यांच्याकडून सरासपणे सेक्सची मागणी केली जात आहे. यामुळे आजच्या घडीला झिम्बाब्वेमध्ये सर्वाधिक महिलांना एड्सची लागण झाल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबद्दल अल जझीराने झिम्बाब्वेमधील तरुणांबरोबर संवाद साधला. त्यावेळी नोकरीच्या मोबदल्यात लाच म्हणून तरुणींकडे शरीरसुखाची मागणी करण्यात येत असल्याचे अनेकांनी सांगितले.

- Advertisement -

यातील काही तरुणी सुपर मार्केटमध्ये काम करत असून नोकरी देणारे दलाल पैसे मागतात आणि पैसे नसतील तर सरळ सेक्सची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे या तरुणी किंवा महिलांना देण्यात येणाऱ्या नोकऱ्या या कायमस्वरूपी नसून तीन ते सहा महिन्यांसाठी आहेत. यामुळे नोकरीचा कार्यकाल पूर्ण झाला कि दुसऱ्या नोकरीसाठीही येथील तरुण, तरुणी महिलांना इच्छेविरोधात कधी एकाहून अधिक दलालांबरोबर शरीरसंबंध ठेवावे लागत आहेत.

परिणामी एकाहून अधिक व्यक्तींशी शारिरीक संबंध ठेवावे लागत असल्याने झिम्बाब्वेमध्ये एड्स रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यातही काही ठिकाणी समलैंगिक दलालांकडून तरुणांचेही नोकरीच्या मोबदल्यात लैंगिक शोषण केले जात असल्याचे समोर आले आहे. अशा गरजू व्यक्तींचा नोकरीच्या मोबदल्यात गैरफायदा घेण्याची लाटच झिम्बाब्वे देशात आली आहे. देश गंभीर आर्थिक संकटात आहे. यामुळे अनेक गरजेच्या वस्तूंची अन्नधान्याची सामानांची औषधांची आयातही थांबली आहे. देशातील उत्पनाचा वेगही मंदावला आहे. कंपन्या बंद पडल्याने बेरोजगारीची लाट या देशात उसळली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -