घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

एथ शालक सासरे मातुळ | आणि बंधू कीं हे सकळ। पुत्र नातू केवळ | इष्टही असती ॥
या ठिकाणी मेहुणे, सासरे, मामा आणि बंधू, तसेच हे सर्व पुत्र, नातू व आप्तही आहेत.
अवधारी अति जवळिकेचे | हे सकळही सोयरे आमुचे म्हणोनि दोष आथी वाचे | बोलतांचि ॥
हे पहा हे सर्व आमचे फार जवळचे आप्त आहेत.तेव्हा यांना मारण्याची गोष्ट नुसती तोंडाने बोलणेदेखील पाप आहे.
हे वरी भलतें करितु | आतांचि येथें मारितु | परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥
उलटपक्षी यांनी वाटेल ते केले किंवा आम्हाला येथेच जरी मारले, तरी आपण त्यांचा घात करण्याचे मनात आणू नये.
त्रैलोक्यींचें अनकळित। जरी राज्य होईल प्राप्त | तरी हें अनुचित | नाचरें मी ॥
त्रिभुवनाचे निष्कंटक राज्य जरी प्राप्त झाले, तरीसुद्धा हे अनुचित कर्म मी करणार नाही.
जरी आजि एथ ऐसें कीजे तरी कवणाच्या मनीं उरिजे? | सांगे मुख केवीं पाहिजे | तुझें कृष्णा? ॥
कृष्णा, आज जर या ठिकाणी आम्ही आप्तांच्या वधासारखे वाईट कृत्य केले, तर कोणाच्या मनांत आमच्याविषयी आदर राहील? आणि तूच सांग की, मग आम्ही तुझे मुख तरी कसे पहावे?
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाऽऽश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः॥
हे जनार्दना ! धृतराष्टाच्या पुत्रांचा वध करून आम्हाला कोणते बरे सुख लाभणार? या आततायींना मारले असता (कुलनाशाचे) पाप मात्र लागेल.
जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडिलासि तुं हातींचा । दूरी होसी ॥
जर मी गोत्रजांना ठार केले, तर मी सर्व दोषांचे आश्रयस्थान बनेन. असे झाल्यामुळे तुझ्याशी जोडलेला संबंध मी माझ्या हातानेच दूर केल्यासारखे होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -