घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तैसें भूतजात माझ्या ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं । निर्विकल्पीं तरी नाहीं । तेथ मीचि मी आघवें ॥
त्याप्रमाणे प्राणी माझ्या ठिकाणी आहेत, अशी मनात कल्पना आली, तर माझ्या ठिकाणी भूते आहेत, असे भासते, तेच कल्पनेच्या अभावी पाहू गेले असता सर्वत्र मी एकच आहे.
म्हणौनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें । जें कल्पनालोपें भ्रंशे । आणि कल्पनेसवें होय ॥
म्हणून भूतांचे नसणे आणि असणे हे कल्पनेच्या संबंधाने भासते व जे कल्पना नाहीशी झाल्यावर भासत नाही आणि कल्पनेबरोबर भासते.
तेंचि कल्पितें मुद्दल जाये । तैं असे नाहीं हें कें आहे?। म्हणौनि पुढती तूं पाहें । हा ऐश्वर्ययोगु ॥
तेच कल्पना उत्पन्न करणारे अज्ञान समूळ नाहीसे झाल्यावर भूतांचे असणे व नसणे हे कोठून भासणार? म्हणून यापुढे माझी अद्भुत कृती तुला सांगतो, ती पाहा.
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणेयातें कल्लोळ एक करीं । मग जंव पाहासी चराचरीं । तंव तूंचि आहासी ॥
अशा या अनुभवरूपी समुद्रात तू स्वत: एक लाट बनून राहा, मग तू या चराचराकडे पाहू लागलास म्हणजे सर्वत्र तूच भरला आहेस, असे तुझ्या दृष्टीस पडेल!
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना? म्हणती देवो । तरी आतां द्वैत स्वप्न वावो । जालें कीं ना? ॥
देव म्हणाले :- अर्जुना ! हे जे मी तुला ज्ञान सांगितले त्याचा तुझ्या मनात काही प्रकाश पडला का! आता तरी तुला जे मी व विश्व ही दोन आहेत असे स्वप्न पडले होते, ते खोटे ठरले ना?
तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसी कल्पनेची झोंप ये । तरी अभेदबोधु जाये । जैं स्वप्नीं पडिजे ॥
परंतु तुझ्या बुद्धीला पुनः जर कल्पनारूपी झोप लागली, तर भेदरूपी स्वप्नांत पडशील व अभेदबोध (जागृती) नष्ट होऊन जाईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -