घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि संवादाचा सुवावो ढळे । तर्‍ही हृदयाकाश सारस्वतें वोळे । आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥
म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या हृदयाकाशात शास्त्रसिद्धान्तरूपी मेघ भरून येतात आणि जर ऐकणाराचे लक्ष नसेल, तर वक्तृत्वाला आलेला रस वितळून जातो.
अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे । म्हणौनि वक्ता तो वक्ता नोहे । श्रोतेनिविण ॥
अहो, चंद्रकात मण्याला पाझर सुटतो, ही गोष्ट खरी आहे; परंतु ही शक्ती एक चंद्राचेच ठायी आहे. म्हणून बोलणारास श्रोत्याशिवाय किंमत नाही.
परी आतां आमुतें गोड करावें । ऐसें तांदुळीं कासया विनवावें? । साइखडियानें काइ प्रार्थावें । सूत्रधारातें? ॥
परंतु आम्हाला गोड करून घ्या अशी तांदुळांना जेवणाराची विनंती करावी लागते का? तसेच कळसूत्री बाहुल्यांना ‘आम्हाला चांगले नाचवा’ म्हणून सूत्रधाराची विनंती करावी लागते का?
तो काय बाहुलियांचिया काजा नाचवी? । कीं आपुलिये जाणिवेची कळा वाढवी । म्हणौनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज ॥
तो सूत्रधार काय बाहुल्यांच्या कामाकरिता त्यांना नाचवितो? नाही. तर तो आपली कुशलता दाखविण्याकरिताच त्यांना नाचवितो; त्याप्रमाणे मी बाहुले आहे, आपण जसे बोलवाल तसे मी बोलणार! म्हणून मला असे बोलवा तसे बोलवा वगैरे प्रार्थना करण्याची उठाठेव कशाला!
तंव श्रीगुरु म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें । आतां सांगैं जें निरोपिलें । नारायणें ॥
त्या वेळी श्रीगुरु निवृत्तीराज म्हणतात, ‘तुला इतके व्याख्यान कशाला करायाला पाहिजे! तुझा सर्व अभिप्राय आम्हाला कळला. तर आता श्रीकृष्णांनी जे अर्जुनास सांगितले, ते श्रोत्यांना सांग.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -